नितीश कुमारांच्या राजकीय भूकंपात प्रशांत किशोर यांचा हात?, रणनीतिकारांचं स्पष्टीकरण…

नितीश कुमारांच्या राजकीय भूकंपात प्रशांत किशोर यांचा हात?, रणनीतिकारांचं स्पष्टीकरण…

नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच तेजस्वी यादव यांनी सुद्धा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, याआधी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजकीय भूकंप केला. त्यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाशी युती केली. मात्र, बिहारमधल्या राजकीय भूकंपात रणनितीकार प्रशांत किशोर यांचा हात असल्याचं सांगितलं जातंय. परंतु त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यात गेल्या १० वर्षातील हे सहावे सरकार आहे. राज्यात जी राजकीय अस्थिरता आहे त्याचा हा पुढील अध्याय आहे. यात दोन गोष्टी आहेत. एक नितीश कुमार मुख्यमंत्री कायम आहेत तर बिहारची स्थिती सुधारली आहे. नितीश कुमार यांनी वेगवेगळे फॉर्मेशन ट्राय केले आहेत, असं प्रशांत किशोर म्हणाले.

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये तुमचे काही योगदान होते का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, प्रशांत किशोर म्हणाले की, यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही. तसेच अशी इच्छा देखील नाही.

२०१५ साली जेव्हा सरकार स्थापन झाले तेव्हा ते एनडीए सोडून आले होते आणि त्याच मुद्यावर निवडणूक लढवली होती. तेव्हा मोदींना पर्याय म्हणून नितीश कुमार यांना पुढे केले होते. त्यानंतर त्यांनी आघाडीसोबत निवडणूक न लढवता एनडीएसोबत विजय मिळवला होता, असं किशोर म्हणाले.

नितीश कुमार २००० साली पहिल्यांदा सात दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २२ वर्षांच्या प्रवासात त्यांनी सहा वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी ८ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हा एक मोठा विक्रम आहे. देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेका यांना आतापर्यंत अनेकवेळा शपथ घेता आली नाही.


हेही वाचा : जेडीयू – भाजप सरकार कोसळलं


 

First Published on: August 10, 2022 2:53 PM
Exit mobile version