Petrol-Diesel Price Today: तेलाचे दर आऊट ऑफ कंट्रोल; आजही पेट्रोल-डिझेल महागले

Petrol-Diesel Price Today: तेलाचे दर आऊट ऑफ कंट्रोल; आजही पेट्रोल-डिझेल महागले

Petrol-Diesel Price Today: तेलाचे दर आऊट ऑफ कंट्रोल; आजही पेट्रोल-डिझेल महागले

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ केली आहे. या आठवड्यात पाच दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंडियन ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझलेचे दर ८० पैशांनी प्रति लीटर वाढवले आहे. अशा प्रकारे पाच दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर ३.२० रुपयांनी वाढले आहेत.

इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (IOCL) माहितीनुसार, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर ९८.६१ रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर ८९.८७ रुपये प्रति लीटर झाले आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर ११२.५१ रुपये प्रति लीटरवरून आज ११३.३५ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेलचे दर ९६.७० रुपयांवरून आता ९७.५५ रुपये प्रति लीटर झाले आहे. दिल्ली व्यतिरिक्त सर्व प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लीटर पार झाले आहे. मध्य प्रदेशाच्या बालाघाटमध्ये पेट्रोलचे दर ११३.०३ रुपये प्रति लीटर झाले असून डिझेलचे ९६.३० रुपये प्रति लीटर झाले आहे.

५ दिवसांत ४ वेळा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

एका आठवड्यात ५ दिवसात ४ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. देशात २२ मार्चला पेट्रोल-डिझेलचे दर ८० पैशांनी वाढले होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली. मग २४ मार्चच्या दरातील स्थिरतेनंतर २५ मार्च आणि आज २६ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार

रशियाने युक्रेनवर हल्ल्या केल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कच्चे तेल १३९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. पण मध्यंतरी घसरण होऊन १०० डॉलरपेक्षा कमी कच्च्या तेलाचे दर झाले होते. आता पुन्हा ब्रेंट क्रूड दर वाढले आहेत.


हेही वाचा – महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’चे स्फोट; फडणवीसांनंतर नवनीत राणांनी दिल्लीत सादर केले पुरावे


 

First Published on: March 26, 2022 9:50 AM
Exit mobile version