Pulwama attack : शहीदांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट

Pulwama attack : शहीदांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट

प्रातिनिधिक

जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा येथे सीआरपीफच्या जवानांवर १४ फेब्रुवारीला दहशदवाद्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत. तब्बल २०० किलोची  स्फोटके या हल्ल्यात वापरली गेली. या हल्ल्यानंतर देशातल्या प्रत्येकाकडून सूड घेण्याची मागणी केली जात आहे. इतकंच नव्हे तर अमेरीका, फ्रान्स यांसारख्या अनेक देशातून  निषेध केला जात आहे. दुसरीकडे देशभरातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. ३७ शहीद झालेल्या जवानांन पैकी १२ जवान हे उत्तर प्रदेश राज्यातले असून ४ जवान पंजाबचे होते.

पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या; कुटुंबीयांचा आक्रोश

जवानांच्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बिहारच्या भागलपूर येथे राहणारे रतन ठाकूर हे देखील या हल्ल्यात शहीद झाले. आपल्या पुत्राला आलेल्या वीरमरणावर ते म्हणाले की, “माझा एक मुलगा मी देशासाठी कुर्बान केला आहे आणि आता मी माझ्या दूसऱ्या मुलाला सुद्धा देशसेवेसाठी कुर्बान करणार आहे. परंतू माझी एक अट आहे की सरकारने पाकिस्तानला सुद्धा सडेतोड उत्तर द्यावे”. याच दरम्यान, पंजाबमध्ये चार जवान शहीद झाले आहेत. पंजाबच्या नागरिकांनाही सूड घेण्याची तेथून सुद्धा बदला घेण्याची मागणी केली जात आहे. संपुर्ण देशात शोककळा पसरली आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आश्वासन देताना म्हटले आहे की, या हल्यातील दोषींना वाचविले जाणार नाही आणि दहशवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.

ही वेळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांची नाही. या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस तीव्र निषेध करते, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आपले मत मांडले आहे.

First Published on: February 15, 2019 8:39 PM
Exit mobile version