घरदेश-विदेशदहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते तब्बल २५०० सीआरपीएफ जवान

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते तब्बल २५०० सीआरपीएफ जवान

Subscribe

पुलवामा येथे घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तब्बल २५०० सीआरपीएफ जवान होते.

पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त भारतीय जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तब्बल २५०० सीआरपीएफ होते, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. जम्मू येथून सीआरपीएफचा ताफा श्रीनगरला जात होता. या दरम्यान पुलवामा येथील महामार्गावर सीआरफीच्या ताफाच्या २५ बस जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांची एक गाडी जवानांच्या बसला धडकली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटमध्ये जवानांच्या बसचा चूरा झाला.

२०० किलो स्फोटकं होती

खरंतर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पूर्ण सीआरपीएफचा ताफा होता. त्यामुळे त्यांनी तब्बल २०० किलो स्फोटकं आणली होती. त्यांनी गाडीतून स्फोट घडवून आणण्याचा बेत आखला होता. आदिल अहमद दार उर्फ वकास याने हा हल्ला घडवून आणला. एका कारमध्ये २०० किलो स्फोटकं भरुन त्याने जवानांच्या बसच्या दिशेने गाडी नेली. तिथे जवानांच्या एका बसला धडक दिली आणि मोठा स्फोट होता. परंतु, या २०० किलोंच्या स्फोटकावरुन दहशतवाद्यांचा आणखी मोठा बेत होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -