…अखेर प्रतिक्षा संपली! दिल्लीत १६ मेपासून पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

…अखेर प्रतिक्षा संपली! दिल्लीत १६ मेपासून पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेली राजधानी दिल्ली (Delhi Monsoon) आता मान्सूनच्या आतुरतेची वाट पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील तापमान ४० अंशांच्या पुढे आहे. मात्र, हवामान खात्याने दिल्लीतील हवामानाबाबत मोठी (IMD) अपडेट दिली आहे. राजधानी दिल्लीत १६ जूनपासून पावसाच्या आगमनाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

१५ जूनपर्यंत उष्णतेपासून या राज्यांना हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट वेदर या खासगी हवामान अंदाज संस्थेच्या अहवालात असे म्हटले आहे की, १५ जूनपर्यंत दिल्ली, हरियाणा, वायव्य राजस्थान आणि हिमाचल प्रदेशच्या विविध भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. १६ जूनपासून पावसाच्या हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे.

कसं असेल दिल्लीचे हवामान?

दिल्लीत या तारखेला हवामानाची स्थिती बदलण्याची शक्यता दिल्लीच्या तापमानाबद्दल सांगायचं झालं तर, १२ जून रोजी दिल्लीत किमान तापमान ३३ अंश आणि कमाल तापमान ४४ अंशांवर नोंदवण्यात आले आहे. दिल्लीत ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : Delhi Heavy Rain: दिल्लीत मुसळधार पावसामुळे दोन जणांचा मृत्यू; जनजीवनही विस्कळीत

दिल्लीतील शहराची स्थिती काय?

दिल्लीतील कमाल तापमान १५ जूनपर्यंत ४१ अंशाच्या पुढे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्यानुसार, दिल्लीत १६ जून रोजी तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. वादळी वाऱ्याच्या हालचाली पहायला मिळू शकतात. येत्या चार दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यातील स्थिती काय?

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. कोकणासह रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे. मुंबईतही पावसाने हजेरी लावली असून मुंबईकर सुखावले आहेत.


हेही वाचा : काँग्रेस पक्ष भाजपा सरकारच्या दडपशाहीसमोर झुकणार नाही – अतुल लोंढे


 

First Published on: June 12, 2022 4:16 PM
Exit mobile version