दिल्ली सोडण्यास नकार

दिल्ली सोडण्यास नकार

गहुंजे गावच्या सरपंच शीतल बोकडे यांना पतीने केली जीवे मारण्याचा प्रयत्न

पत्नीने दिल्ली शहर सोडण्यास नकार देताच, पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. त्यामुळे संतापून पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार दिल्लीत घडला. महत्वाचे म्हणजे दोघांनी 2013 मध्ये प्रेमविवाह केला होता.
दोघेही आझमगडचे राहणारे होते. मात्र, लग्नानंतर ते दिल्लीतील नजफगड भागात राहत होते. मुलगी त्यावेळी अल्पवयीन होती. यामुळे पतीविरोधात उत्तर प्रदेशमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. नंतर 2017 मध्ये न्यायालयाने मुलीच्या सांगण्यावरून खटला रद्द केला होता.

2 ऑक्टोबरला पोलिसांना या महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली. मात्र तिचा पती आफताब अहमद फरार झाला होता. आदल्या रात्री दोघेही एकत्रच होते. त्यांचा 4 वर्षांचा मुलगा आझमगड येथे राहतो. अफताबच्या मोबाईलची लोकेशन कधी सहारनपूर तर कधी लखनौ अशी येत होती. यानुसार पोलिसांनी त्याला काकीच्या घरातून अटक केली.

त्याने दिलेल्या माहितीनुसार पत्नीसोबत दिल्ली सोडून आझमगडला राहण्यास जाण्यासाठी बर्‍याचदा भांडणे होत होती. त्याला आझमगढला राहायचे होते. मात्र, पत्नीचा त्याला विरोध होता. यामुळे त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. 2 ऑक्टोबरलाही याच गेष्टीवरून भांडण झाले. यावेळी आफताबने घरातील चाकूने तिचा गळा कापला. तसेच तिचा गळा ओढणीने दाबून फरार झाला.

First Published on: October 8, 2018 1:05 AM
Exit mobile version