मंकीपॉक्सची आणखी दोन लक्षणे संशोधनातून समोर आली ; जाणून घ्या नवीन लक्षणांबाबत

मंकीपॉक्सची आणखी दोन लक्षणे संशोधनातून समोर आली ; जाणून घ्या नवीन लक्षणांबाबत

मंकीपॉक्सचा(monkeypox) धोका आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका अधिकच वाढला आहे. मंकीपॉक्स आता 80 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. १७,००० पेक्षा अधिक अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याच संदर्भांत शास्त्रज्ञ अजूनही मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार कसा होतो आणि तो लैंगिक संक्रमित रोग आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, संशोधकांना मंकीपॉक्सची दोन नवीन लक्षणे संशोधनात आढळून आली आहेत. जी या आधी अली नव्हती.

हे ही वाचा – भारताला मंकीपॉक्सचा धोका? टास्क फोर्स तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊ

ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात यूकेमधील १९७ मंकीपॉक्स रुग्णांचा डेटा पाहिला दिला. मंकीपॉक्सच्या(monkeypox) लक्षणांमध्ये कसा बदल होत गेला यावरही संशोधन केले गेले. यांचं संशोधनात संशोधकांना असे आढळले की ही लक्षणे मागील लक्षणांपेक्षा खूपच वेगळा आहे.

लक्षणे

संशोधनात आढळलेल्या नवीन लक्षणांपैकी एक म्हणजे सॉलिटरी जखमा, ज्याला इंग्रजीमध्ये सॉलिटरी लेसरेशन असेही म्हणतात. सहसा या प्रकारच्या जखमा लहान असतात. हे चामखीळ किंवा मेलेनोमा देखील असू शकते. म्हणजेच मंकीपॉक्समुळे होणारी जखम सिफिलीस किंवा इतर लैंगिक संसर्ग देखील मानली जाऊ शकते.

हे ही वाचा – नियमित दारु पिण्याऱ्यांमध्ये भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या वाढली

संशोधनातील अभ्यासात असे समोर आले की रूग्णांनी टॉन्सिल्स सुजल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडे देखील केल्या त्यासोबत रुग्णांना काही जखमा सुद्धा झाल्या. ही दोन्ही लक्षणे पूर्वी दिसली नव्हती आणि त्यांना मंकीपॉक्स व्यतिरिक्त इतर रोग देखील यातून येऊ शकतात.

मंकपॉक्सची इतर सामान्य लक्षणे –

ताप, डोके दुखी, पाठदुखी, थकवा, सांधे दुखी मंकीपॉक्सची ही सामान्य लक्षणे आहेत.

हे ही वाचा – कर्नाटकातील ‘या’ गावात नाही मुस्लिम कुटुंब, पण साजरा होतो मोहरम

भारतासह जगभरात कोरोना महामारीची साथ संपत नाही तोवर मंकीपॉक्स या जीवघेण्या व्हायसरने डोकं वर काढलं आहे. भारतातील केरळमध्ये मंकीपॉक्समुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली. मात्र भारतात मंकीपॉक्स (monkeypox) साथीचा फारसा धोका नाही मात्र योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांनी दिली आहे.

First Published on: August 9, 2022 8:42 PM
Exit mobile version