भारताला मंकीपॉक्सचा धोका? टास्क फोर्स तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊ

another suspected case of monkeypox reported in kerala

भारतासह जगभरात कोरोना महामारीची साथ संपत नाही तोवर मंकीपॉक्स या जीवघेण्या व्हायसरने डोकं वर काढलं आहे. भारतातील केरळमध्ये मंकीपॉक्समुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली. मात्र भारतात मंकीपॉक्स साथीचा फारसा धोका नाही मात्र योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांनी दिली आहे.

पुणे ऑबस्ट्रेटिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी’तर्फे (पीओजीएस) आयोजित ‘रिप्रोडक्टिव्ह एंडोक्राइनोलॉजी (एनसीआरई)’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत डॉ. जोशी बोलत होते. यावेळी डॉ. जोशी म्हणाले की, कोरोनाचा धोका आता गंभीर राहिलेला नाही. मात्र विविध आजारांचे मोठे आव्हान आरोग्य क्षेत्रासमोर निर्माण झाले आहे. विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार आता मोठी समस्या बनतेय. 2017 च्या प्रसिद्ध एका अहवालानुसार, दरवर्षी 40 लाख नागरिकांना या आजारांमुळे मृत्यू होत आहे. तर 2019 मध्ये प्रसिद्ध अहवालात हे प्रमाण वाढून 68 लाखांवर पोहचले आहे. यात जगभरात कार्डिओ- मेटाबॉलिक आजारांचे वाढते प्रमाणही वाढतेय.

त्यामुळे नागरिकांनी विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आणि आरोग्य सुविधा केंद्रे या ठिकाणी वावरताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान भारतात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असून दिल्ली आणि केरळमध्ये प्रत्येकी एक एक रुग्ण आढळून आला आहे. ज्यामुळे भारतातील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या 8 वर पोहचली आहे. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच राज्यांना यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या आजारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी एक टास्क फोर्स देखील तयार केला आहे. NITI आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.


हेही वाचा : बिहारमध्ये जेडीयू- बीजेपी युती अखेर तुटली; जेडीयू- आरजेडीसोबत स्थापन करणार नवं सरकार