कर्जबुडव्या विजय मल्ल्याचे शेअर विकून १००८ कोटी वसूल

कर्जबुडव्या विजय मल्ल्याचे शेअर विकून १००८ कोटी वसूल

विजय मल्ल्याने

भारतातील बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून ब्रिटनमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याची जप्त केलेल्या शेअरची पहिल्यांदाच विक्री करण्यात आली आहे. बुधवारी विजय मल्ल्याचे लाखो शेअर विकून १००८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. एका पीएलएलए कोर्टाने परवानगी दिल्यानंतर डीआरटीने यूबीएल कंपनीत विजय मल्ल्याच्या हिस्स्याचे शेअर विकले. बँकांना चूना लावून परदेशात परास झाल्यानंतर ईडीने विजय मल्ल्याचे शेअर जप्त केले होते.

कोर्टाच्या परवानगीनंतर विकले शेअर

ईडीने सांगितले की, मल्ल्याच्याविरोधात सुरु असलेली संपत्तीची चौकशी प्रक्रियेनुसार एजन्सीने या शेअरला जप्त केले होते. कर्नाटक हाय कोर्टाच्या आदेशानंतर या शेअरला कर्ज पुनर्प्राप्ती न्यायाधिकरण (डीआरटी) कडे जमा करण्यात आले होते. पीएमएलए कोर्टाने विजय मल्ल्याने बँकांना लावलेले हजारो कोटींच्या चुन्याची रक्कम पाहता शेअर विकण्याची परवानगी दिली.

शेअर विकून १००८ कोटी वसूल

दरम्यान, डीआरटीने यूनाइटेड ब्रेवरीज लिमिटेड (यूबीएल) कंपनीमध्ये मल्ल्याच्या हिस्स्याचे ७४ लाख ४ हजार ९३२ शेअर विकून १००८ कोटी रुपये वसूल केले. शेअर विक्रीवेळी बीएसईवर (बॉम्बे स्टॉक एक्सेंज) या विजय मल्ल्याच्या एका शेअरची किंमत १३७० रुपये एवढी होती. याआधी यूबीएलने पीएमएलए कोर्टामध्ये याचिका दाखल करुन डीआरटीला शेअर विकण्यावर परवानगी नाकारावी अशी मागणी केली होती. यूबीएलने केलेली याचिका कोर्टाने फेटाळत असे सांगितले की, कोर्टाकडे अशाप्रकारची विक्री थांबवण्याचा अधिकार नाही. मार्च २०१६ मध्ये विजय मल्ल्या देश भारत सोडून पळाल्यानंतर त्याच्या जप्त केलेल्या संपत्तीची पहिल्यांदाच विक्री करण्यात आली आहे.

हेही वाचा – 

‘माझे पैसे घ्या आणि जेट एअरवेजला वाचवा’, विजय मल्ल्या भाजपवर उखडला

कर्जबुडव्या विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण होणार

First Published on: March 28, 2019 10:10 AM
Exit mobile version