घरदेश-विदेशकर्जबुडव्या विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण होणार

कर्जबुडव्या विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण होणार

Subscribe

ब्रिटन गृहमंत्र्याच्या आदेशानंतर मल्ल्याला प्रत्यार्पणाच्याविरोधात अपील करण्यासाठी फक्त १४ दिवसांचा अवधी आहे. जर त्याने अपील केले नाही तर त्याचे भारताकडे हस्तांतरण केले जाणार आहे.

भारतातील बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून ब्रिटनमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी मिळाली आहे. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या करारावर ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अपील करण्यासाठी मल्ल्याला १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा विजय मल्ल्याचे भारताकडे हस्तांतरण केले जाणार आहे.

- Advertisement -

९ हजार कोटींच्या बुडीत कर्जा प्रकरणात किंगफिशरचा मालक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणा गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न करत होती. आता ब्रिटन सरकारने मल्ल्याच्य प्रत्यार्पणाला मंजूरी दिल्यामुळे आता मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटन गृहमंत्र्याच्या आदेशानंतर मल्ल्याला प्रत्यार्पणाच्याविरोधात अपील करण्यासाठी फक्त १४ दिवसांचा अवधी आहे. जर त्याने अपील केले नाही तर त्याचे भारताकडे हस्तांतरण केले जाणार आहे. ब्रिटन सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिल्यामुळे मल्ल्याला चांगलाच धक्का बसला आहे.

- Advertisement -

१८ एप्रिल २०१६ रोजी विजय मल्ल्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. तरी, तत्पूर्वी त्याने देशतून पळ काढला होता. माल्याला भारतात आणण्यासाठी सरकारने खूप प्रयत्न केले. त्याच दरम्यान २०१८ सालीत त्याला फरारही घोषीत करण्यात आले होते. विजय मल्ल्याची १३ हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा केंद्र सरकारने नुकताच केला होता. यावर विजय मल्ल्या यानेही दुजोरा देत उलट्या बोंबा मारल्या होत्या. गेल्या महिन्यातच ब्रिटनमधील न्यायालयाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याचा निकाल भारताच्या बाजुने दिला होता. त्यानंतर आता ब्रिटन सरकारने त्याच्या प्रत्यार्पणावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -