Russia Ukraine War : फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने रशियाला केलं बॅन

Russia Ukraine War : फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने रशियाला केलं बॅन

Russia Ukraine War :  रशिया युक्रेनमधील युद्धाचा संघर्ष वाढत असताना दुसरीकडे रशियाची कोंडी करण्यासाठी इतर देश सज्ज झाले आहेत. रशियाची कोंडी करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने रशियाला बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियात हे तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन आहेत. याआधी फेसबुकने रशिया विरोधात काही निर्बंध लागू केले होते मात्र आता या तिन्ही माध्यमांनी रशियाला बॅन केले असून रशियाची कोंडी करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. ही तिन्ही माध्यमे जगभरात वापरले जातात. त्यामुळे अशा प्रकारे रशियाची आणि पुतिन यांनी कोंडी करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह रशियाच्या ताब्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

पुतिन यांनी फिनलँड, स्वीडनला नाटोमध्ये सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. युक्रेनच्या आधी जॉर्जेया, मॉलदोवा यांना देखील असेल इशारे देण्यात आले होते.जॉर्जेयावर हल्ले देखील करण्यात आले होते. त्याचप्रमाणे काळा समुद्रात युक्रेनला रशियन सैन्यांनी वेढा घातल्याचा दावा देखील रशियाकडून करण्यात आला आहे.

Russia Ukraine War : वय ८० तरीही युद्धासाठी सज्ज! युक्रेन सैन्यात भरतीसाठी दाखल जवानाचा फोटो व्हायरल

रशिय युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी किव्हजवळ ३० किमी अंतरावर रशियन सैन्य पोहोचले आहे. कीव्हमध्ये संध्याकाळी ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कर्फ्यू दरम्यान कुणीही रस्त्यावर दिसल्यास त्यांना गोळ्या घातल्याचे आदेश देण्यात आले आहेत. लीव, खेरसान, मायकोलेव्ह या ठिकाणी सतत बॉम्बहल्ले सुरू आहेत.

Russia-Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देश सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला; म्हणाले, ‘माझी सुटका नको, दारुगोळा हवा’

युक्रेन रशियातील संघर्ष वाढत असताना. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी शरणागती पत्करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. तर दुसरीकडे रशियाच्या सीमाभागात युक्रेनचा जोरदार हल्ला सुरू आहे. रशियाच्या रोस्तोव शहरावर युक्रेनने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या १२९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान भारताकडे रवाना

First Published on: February 26, 2022 7:39 PM
Exit mobile version