घरताज्या घडामोडीRussia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे पहिले...

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान भारताकडे रवाना

Subscribe

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी शनिवारी एअर इंडियाने बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे उड्डाणे होणार आहेत. युक्रेन रोमानिया सीमेवर पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जाणार आहेत. त्यानंतर एअर इंडियाच्या फ्लाइटद्वारे मायदेशी परत आणले जाणार आहे.

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी गेलेले एअर इंडियाचे विमान  219 भारतीयांना घेऊन भारताच्या दिशेने रवाना झाले आहे. एअर इंडियाचे AIC1944 हे पहिले विमान 219 भारतीयांना घेऊन बुखापरेस्ट (Bucharest) इथल्या हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन निघाले असून मुंबईत येत आहे. आज संध्याकाळी उशिरा हे विमान मुंबईत पोहचण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे स्वत: मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर युक्रेनहून मायदेशी परतणाऱ्या भारतीय नागरिकांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. भारतीयांचे आगमन सुरळीत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी शनिवारी एअर इंडियाने बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे उड्डाणे होणार आहेत. युक्रेन रोमानिया सीमेवर पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जाणार आहेत. त्यानंतर एअर इंडियाच्या फ्लाइटद्वारे मायदेशी परत आणले जाणार आहे.

- Advertisement -


युक्रेनच्या पश्चिम सीमेवरुन भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढू असे आश्वासन रशियाचे पंतप्रधान पुनित यांनी भारताचे पंतप्रधान मोदींना दिले आहे. दिल्ली बुखारेस्ट आणि मुंबई बुखारेस्ट अशी पहिली दोन उड्डाणे होणार आहेत. ज्यातून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी आणले जाणार आहे.

Hindu officer in Lt colonel in Pak: पाकच्या सैन्यात प्रथमच दोन हिंदू लेफ्टनंट कर्नलचा समावेश, जाणून घ्या माहिती

- Advertisement -

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना पुन्हा भारतात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याशिवाय सीमेवर येऊ असे असे आवाहन केले आहे.


हेही वाचा –  Russia Ukraine War-विद्यार्थी स्वत:च्या फायद्यासाठी गेलेत, मेले तर सरकार दोषी नाही-IPS अधिकारी

हेही वाचा –  Russia Ukraine War : वय ८० तरीही युद्धासाठी सज्ज! युक्रेन सैन्यात भरतीसाठी दाखल जवानाचा फोटो व्हायरल

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -