घरताज्या घडामोडीRussia Ukraine War : वय ८० तरीही युद्धासाठी सज्ज! युक्रेन सैन्यात भरतीसाठी...

Russia Ukraine War : वय ८० तरीही युद्धासाठी सज्ज! युक्रेन सैन्यात भरतीसाठी दाखल जवानाचा फोटो व्हायरल

Subscribe

युद्धात सहभागी होण्यासाठी अनेक तरुण मंडळी पुढे आली आहेत. त्यातील एका जवानाचा फोटो सध्या व्हायरल होतोय. वय ८० वर्ष असूनही युद्धासाठी सज्ज असलेल्या आजोबांनी सैन्यात भर्ती होण्यासाठी हजेरी लावली. या जवानाचा फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचे अनेक ह्रदयद्रावक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहेत. तिथली परिस्थिती पाहून मन हेलावून जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे. दरम्यान युक्रेनमधील १८ ते ६० वर्षाच्या लोकांना देश सोडून जाण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान युक्रेनच्या मेट्रो स्टेशनवर एकमेकांना शेवटचा निरोप देणारे कपल, मुलीला शेवटचा निरोप देताना ढसाढसा रडणारा बाप ही सगळी दृष्ये अक्षर: मन हेलावून टाकणारी आहेत. युक्रेयिन महिलांना देश सोडून जाण्याची परवानगी दिलीय तर पुरुषांना युद्धात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युद्धात सहभागी होण्यासाठी अनेक तरुण मंडळी पुढे आली आहेत. त्यातील एका जवानाचा फोटो सध्या व्हायरल होतोय. वय ८० वर्ष असूनही युद्धासाठी सज्ज असलेल्या आजोबांनी सैन्यात भर्ती होण्यासाठी हजेरी लावली. या जवानाचा फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Russia-Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देश सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला; म्हणाले, ‘माझी सुटका नको, दारुगोळा हवा’

- Advertisement -

कॅटरिना युशचेंको नावाच्या एका युझरने हा फोटो शेअर केला आहे. ज्यात आजोबा आपल्या सगळ्या वस्तू बॅगेत भरुन बॅग सैन्याच्या हवाले करताना दिसत आहेत. कॅटरिनाने पोस्ट मध्ये म्हटले आहे की, कोणीतरी या ८० वर्षीय आजोबांचा फोटो शेअर केलाय. त्यांना युद्धासाठी सैन्यात भर्ती व्हायचे आहे. त्यांच्याकडे २ टी-शर्ट, पँटची एक जोडी,एक टूथब्रश आणि दुपारचे जेवण करण्यासाठी काही सँडविच असे सामान असलेली एक बॅग आहे. आपल्या नातवंडांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना सैन्यात भर्ती व्हायचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

russia ukraine war : युक्रेनसोबत चर्चा करण्यास रशियाची तयारी, मात्र घातली ‘ही’ अट

सोशल मीडियावर हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. आतपर्यंत या फोटोला २ लाखांहून लाईक्स तर लाखो कमेंट्स आल्या आहेत. आपल्या देशासाठी वयाच्या ८० वर्षी असलेला उत्साह पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine Crisis: No War Please..रशियाच्या टेनिसपटूने युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिला अनोखा संदेश, व्हिडिओ व्हायरल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -