Russia Ukraine War: पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, युक्रेनने केला ड्रोन हल्ला; पाहा VIDEO

Russia Ukraine War: पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, युक्रेनने केला ड्रोन हल्ला; पाहा VIDEO

Russia Ukraine War Ukrainian drone attack on President Vladimir Putin house see video Kremlin

Ukraine Drone Attack At Kremlin: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान आज दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढल्याचे दिसून आले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मारण्यासाठी युक्रेनने मॉस्कोवर ड्रोनने हल्ला केल्याचे रशियाने म्हटले आहे. मात्र, तो हल्ला रशियन सैन्याने हाणून पाडला आहे. रशियन सैन्याने युक्रेनचे ड्रोन पाडले आहे. आता क्रेमलिनने युक्रेनला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. ( Russia Ukraine War Ukrainian drone attack on President Vladimir Putin house see video Kremlin )

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना दहशतवाद्यांप्रमाणे मारण्यासाठी युक्रेनने ड्रोन पाठवले, असे रशियन सरकारकडून सांगण्यात आले आहे. याची मोठी किंमत त्याला मोजावी लागणार आहे. रशियाचे ‘पॉवर हाऊस’ समजल्या जाणाऱ्या क्रेमलिनने बुधवार, ३ मे रोजी एका निवेदनात म्हटले आहे, “युक्रेनने आज ड्रोनने क्रेमलिनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याचे कृत्य म्हणजे “दहशतवादी हल्ला” आहे. आम्हाला स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.

रशियन सैन्याने युक्रेनचे दोन ड्रोन पाडले

क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने रात्री रशियन प्रेसिडेंशियल हाऊसवर युक्रेनने सोडलेले दोन ड्रोन पाडले आहेत. हे ड्रोन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश युक्रेनला घातक शस्त्रे पुरवत असल्याचा रशियन सरकारचा आरोप आहे. युक्रेनला आतापर्यंत अब्जावधी डॉलर्सच्या छोट्या-मोठ्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला गेला आहे. युक्रेनकडे अत्याधुनिक ड्रोनचा ताफा असल्याचेही सांगण्यात येत आहे.

( हेही वाचा: लग्न टिकवण्यात भारताचा क्रमांक पहिला, ‘या’ देशात होतात सर्वाधिक घटस्फोट )

पुतिन सरकार खोटं बोलत आहे

दरम्यान, युक्रेनच्या वोलोदिमीर झेलेन्स्की सरकारचे एक वक्तव्य समोर आले आहे. युक्रेनने रशियाच्या आरोपांना प्रोपगंडा म्हटले आहे. युक्रेन सरकारचे म्हणणे आहे की त्यांनी मॉस्कोला कोणतेही ड्रोन पाठवले नाहीत. झेलेन्स्की सरकारचे मंत्री म्हणाले की, क्रेमलिनवर ड्रोन हल्ल्याचा कट रचल्याचा रशियाचा आरोप निव्वळ अपप्रचार आहे.

( हेही वाचा:  B.Tech केलेली मुलगी टॅक्सी ड्रायव्हर ; संघर्ष कथा ऐकून तुम्हीही कराल तिच्या धाडसाचं कौतुक )

First Published on: May 3, 2023 7:46 PM
Exit mobile version