जेईई मेन परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये रशियन नागरिकाकडून हॅकिंगचा प्रयत्न; सीबीआयने ठोकल्या बेड्या

जेईई मेन परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये रशियन नागरिकाकडून हॅकिंगचा प्रयत्न; सीबीआयने ठोकल्या बेड्या

जेईई मेन 2021 परीक्षेच्या सॉफ्टवेअर हॅकिंगचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका रशियन नागरिकाला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (CBI) अटक केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे.सीबीआयने म्हटले की, सीबीआयने गेल्या वर्षी झालेल्या आयआयटी जेईई (मुख्य) परीक्षेतील कथित हॅकिंगच्या चौकशीच्या संदर्भात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने या प्रतिष्ठित परीक्षेत कथित हॅकिंगचा प्रयत्न केल्याप्रकरणातील हा मुख्य हॅकर असल्याचा संशय व्यक्त करत या परदेशी नागरिकाविरुद्ध ‘लुक आऊट परिपत्रक’ जारी केले आहे. मिखाईल शार्गिन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले तेव्हा तो कझाकिस्तानमधून भारतात आला होता.

एका निवेदनानुसार, तपासादरम्यान जेईई (मुख्य) सह अनेक ऑनलाइन परीक्षांमध्ये फेरफार करण्यात काही परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. एका रशियन नागरिकाच्या भूमिकेबाबत खुलासा झाला आहे की, ज्याने iLeon सॉफ्टवेअरशी छेडछाड केली होती (ज्या प्लॅटफॉर्मवर JEE (मुख्य)-2021 परीक्षा घेतली होती.) आणि परीक्षेदरम्यान संशयित उमेदवारांची कंम्प्युटर सिस्टम हॅक केली तसेच अन्य आरोपींची मदत केली होती.

परदेशातून रशियन नागरिक विमानतळावर आल्यावर केंद्रीय यंत्रणांनी सीबीआयला अलर्ट केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सीबीआयने ताबडतोब आरोपीला रोखले आणि जेईई परीक्षेत छेडछाड केल्याप्रकरणी त्याची चौकशी सुरू केली आहे. एजन्सीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अॅफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे तीन संचालक – सिद्धार्थ कृष्णा, विश्वंभर मणी त्रिपाठी आणि गोविंद वार्ष्णेय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तिन्ही संचालकांनी जेईई (मुख्य) ऑनलाइन परीक्षेत फेरफार करून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना देशातील आघाडीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी इतर सहयोगी आणि दलालांसोबत कट रचल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, हरियाणातील सोनीपत येथील निवडक परीक्षा केंद्रातून अर्जदारांच्या प्रश्नपत्रिका तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवल्या जात होत्या.


सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवल्यास OTT आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मची खैर नाही; केंद्राचा इशारा

First Published on: October 3, 2022 9:18 PM
Exit mobile version