घरदेश-विदेशसट्टेबाजीच्या जाहिराती दाखवल्यास OTT आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मची खैर नाही; केंद्राचा इशारा

सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवल्यास OTT आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मची खैर नाही; केंद्राचा इशारा

Subscribe

सट्टेबाजीच्या जाहिरातींविरोधात भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. केंद्राने नवीन वेबसाइट्स, OTT प्लॅटफॉर्म आणि खाजगी टीव्ही चॅनेल्सला बेटिंग साइट्सच्या जाहिराती प्रसारित करण्यापासून परावृत्त करण्यात सांगितले आहे. यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक सूचना जारी केली आहे. मंत्रालयाने नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ तसेच खाजगी उपग्रह टीव्ही चॅनेल सारख्या ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्मवर सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवण्याविरुद्ध ही कठोर सूचना जारी केली आहे.

सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यास लागू केलेल्या कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे त्यात म्हटले आहे. केंद्राने जारी केलेल्या सुचनांनुसार,सट्टेबाजीचे प्रमोशन करणाऱ्या जाहिराती किंवा प्रमोशन कंटेन्ट आजही अनेक न्यूज प्लॅटफॉर्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसत आहे. असे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. यात काही ऑनलाइन ऑफशोअर सट्टेबाजीच्या प्लॅटफॉर्मने डिजिटल मीडियावर सट्टेबाजी प्लॅटफॉर्मची जाहिरात करण्यासाठी न्यूज वेबसाईट्स वापर सरोगेट प्रोडक्ट म्हणून करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

भारतातील बहुतेक भागांमध्ये बेटिंग अर्थात सट्टेबाजी आणि जुगार हे बेकायदेशीर क्रियाकलाप आहेत. त्यामुळे सरकारने आपल्या सुचनेत म्हटले की, “ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी आणि फसव्या जाहिरातीं रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या परिच्छेद 9 नुसार, असे आढळून आले आहे की, बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर आहे, यामुळे ऑनलाइन ऑफशोअर बेटिंग आणि जुगारासंबंधीत प्लॅटफॉर्मच्या जाहिराती देखील बेकायदेशीर आहे. माहिती तंत्रज्ञान (डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम 2021 नुसार, मंत्रालयाने म्हटले आहे की, बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती ही एक बेकायदेशीर क्रियाकलाप आहे, ज्या डिजिटल मीडियावर दाखवल्या जाऊ शकत नाहीत.


शिवाजी पार्कवर महाविकास आघाडीचा मेळावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -