समझौता एक्स्प्रेसची सेवा सुरु; आज दिल्लीवरुन होणार रवाना

समझौता एक्स्प्रेसची सेवा सुरु; आज दिल्लीवरुन होणार रवाना

समझौता एक्सप्रेस

समझौता एक्स्प्रेस आजपासून धावणार आहे. आज दिल्लीतून समझौता एक्स्प्रेस दिल्लीसाठी रवाना होणार आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागात असलेल्या तणावाच्या परिस्थितीचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला. या तणावामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना जोडणारी समझौता एक्स्प्रेस पाकिस्तानकडून रद्द करण्यात आली होती. त्यानंतर भारताकडून देखील ही एक्स्प्रेस पाकिस्तानात पाठवण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांना कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. दरम्यान, भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात परत पाठवल्यानंतर दोन्ही देशातील ट्रेन पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – समझौता एक्स्प्रेस अटारी बॉर्डरवर अडवली


आज समझौता एक्स्प्रेस सुटेल

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने भारतात सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी समझौता एक्स्प्रेस पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली रेल्वे स्टेशनवरुन रविवारी आणि बुधवारी सुटणारी ही ट्रेन ३ मार्चला दिल्लीवरुन रवाना होईल. रविवारी रात्री ११ वाजता ही ट्रेन अटारीसाठी निघेल तिथून ती लाहौरला रवाना होईल. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून ट्रेन सुरु करण्याची माहिती आल्यानंतर भारताने ट्रेन पाकिस्तानकडे सोडण्याचा निर्णय घेतला. लाहौरवरुन ही ट्रेन दिल्लीसाठी सोमवारी सुटणार आहे.

तणावामुळे ट्रेन केली होती रद्द

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा बदला घेतला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारताने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्य तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने भारताकडून सुटलेली समझौता एक्स्प्रेस अटारी बॉर्डरवर अडवली होती. २८ फेब्रुवारीपासून समझौता एक्स्प्रेस रद्द करण्यात आली तेव्हापासून ही एक्स्प्रेस चालवण्यात आली नाही. आजपासून ही एक्स्प्रेस धावणार आहे. दिल्लीतून ही ट्रेन सुटणार आहे. सोमवारी ही एक्स्प्रेस पुन्हा भारताकडे रवाना होईल.

First Published on: March 3, 2019 10:59 AM
Exit mobile version