COVID-19 vaccine: कोविशिल्ड लसीचे ठरले दर; सरकारी रुग्णालयात प्रति डोस ४०० रुपये, तर खासगी रुग्णालयात ६०० रुपये

COVID-19 vaccine: कोविशिल्ड लसीचे ठरले दर; सरकारी रुग्णालयात प्रति डोस ४०० रुपये, तर खासगी रुग्णालयात ६०० रुपये

Covishield Vaccine: परदेशात जाणाऱ्या व शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना २८ दिवसानंतर कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस

देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने चिंता वाढवली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहेत. २ लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहे. याच पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. तसेच १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील व्यक्तींना लस घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारत सरकारने तयार होणाऱ्या लसीचा अर्धा हिस्सा राज्यांना देण्यास सांगितला आहे. त्यामुळे लसीची विक्री खुल्या बाजारात देखील करता येणार आहे. याच अनुषंगाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) ‘कोविशिल्ड’ लसीची किंमत ठरवली आहे.

लसीची उत्पादन घेणारी कंपन्या आता सरकारी आणि खासगी रुग्णालयात लसीची विक्री करू शकतात. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूने लसीचे दर निश्चित केले आहेत. राज्य सरकार ४०० रुपये प्रति डोस हिशोबाने लस खरेदी करू शकतात. तर खासगी रुग्णालयांमध्ये एक डोससाठी ६०० रुपये द्यावे लागणार आहेत.

सीरम इन्स्टिट्यूने सांगितले की, ‘लसीच्या एकूण उत्पादनांपैकी ५० टक्के उत्पादन भारत सरकारच्या लसीकरणाच्या मोहीमेत दिले जाईल. तर उर्वरित ५० टक्के सरकारी आणि खासगी रुग्णालयांना दिले जाईल. तसेच पुढील दोन महिन्यांत आम्ही उत्पादन वाढवून लसीचा तुटवडा भरून काढू.’

तसेच देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन घेणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने पुढे सांगितले की, ‘पुढील पाच महिन्यांनंतर लस रिटेल आणि फ्री ट्रेडमध्ये उपलब्ध होईल.’ सीरम इन्स्टिट्यूट कोविशिल्डचे उत्पादन करत असून ही लस एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने मिळून विकसित केली आहे.


हेही वाचा – Double Mutant, वेरीयंट्स विरोधात Covaxin प्रभावी, ICMR चे शिक्कामोर्तब


 

First Published on: April 21, 2021 3:57 PM
Exit mobile version