लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडला अटक; दिल्ली-मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा रचला होता कट

लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडला अटक; दिल्ली-मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा रचला होता कट

लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडला अटक; दिल्ली-मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा रचला होता कट

लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाइंड अटक करण्यात आली आहे. जर्मनीमध्ये पोलिसांनी बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेशी संबंधित दहशतवादी जसविंदर सिंह मुल्तानीला अटक केली आहे. लुधियाना कोर्टात झालेल्या बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंड जसविंदर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दिल्ली आणि मुंबईतील दहशतवादी हल्ला करण्याचा जसविंदरने कट रचला होता असा आरोप देखील त्याच्यावर करण्यात आला आहे.

माहितीनुसार, ४५ वर्षीय जसविंदर सिंह एसएफजेचे संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नीचे जवळचा असल्याचे बोलले जात आहे. जसविंदर सिंहवर फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच जसविंदर सिंहने सिंघु बॉर्डवर शेतकरी नेता बलवीर सिंह राजेवालची हत्याचा कट रचला होता. ज्यासाठी जीवन सिंह नावाच्या व्यक्तीला भडकावले होते. हत्येसाठी मध्यप्रदेशहून हत्यार जीवन सिंहला दिले होते. पण त्यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जीवन सिंहला अटक केली होती.

सुत्रांच्या माहितीनुसार, यादरम्यान पहिल्यांदा जसविंदर सिंहचे नाव स्पेशल सेलच्या समोर आले होते. मग स्पेशल सेलने याबाबत केंद्रीय तपास यंत्रणेंना माहिती दिली. शिवाय शेतकरी नेते राजेवाला यांना सुरक्षा घेण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर जीवन सिंहच्या मोबाईलमधून मुल्तानी संपर्कात असून जर्मनीत असल्याचे समजले. दोन दिवसांपूर्वी RAW ची टीम जर्मनीमध्ये मुल्तानीच्या फ्लॅटवर गेली होती आणि तिथे तपास केला होता.

२३ डिसेंबरला लुधियान कोर्ट परिसरातील दुसऱ्या मजल्यावर टॉयलेटमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. हा स्फोट IEDद्वारे केला होता. IEDचा वापर केल्यामुळे या दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तपास यंत्रणेने संशय व्यक्त केला होता की, ज्याचा मृत्यू झाला होता, तोच या स्फोटात सामिल होता. टॉयलेटमध्ये जेव्हा बॉम्ब बनवण्याचा (असेंबल) प्रयत्न करत होता तेव्हा स्फोट झाला होता.


हेही वाचा – बुलेट अन् बॉम्ब प्रूफ प्रोटेक्शन! कोट्यावधींची मर्सिडीज पंतप्रधानांच्या ताफ्यात


 

First Published on: December 28, 2021 10:35 AM
Exit mobile version