घरताज्या घडामोडीबुलेट अन् बॉम्ब प्रूफ प्रोटेक्शन! कोट्यावधींची मर्सिडीज पंतप्रधानांच्या ताफ्यात

बुलेट अन् बॉम्ब प्रूफ प्रोटेक्शन! कोट्यावधींची मर्सिडीज पंतप्रधानांच्या ताफ्यात

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात आता मर्सिडीज-मेबॅक एस ६५० (Mercedes-Maybach S650) या गाडीने प्रवेश केला आहे. नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद हाऊसमध्ये जाताना नवीन मर्सिडीज-मेबॅक एस ६५० या गाडीत दिसले होते. पुन्हा एकदा ही गाडी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात दिसली आहे. माहितीनुसार या मर्सिडीजची किंमती १२ कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षेच्या गरजा ओळखतात आणि ते ज्या व्यक्तीचे संरक्षण करत आहेत, त्यांना नवीन वाहनाची गरज आहे की नाही हे ठरवते.

- Advertisement -

Mercedes-Maybach S650 या गाडीचे वैशिष्ट्ये

मर्सिडीज-मेबॅक एस ६५० या गाडीमध्ये ६.० लीटर ट्वीन-टर्बो V12 इंजन आहे. जे 516bhp आणि सुमारे 900Nm पीक टॉर्क निर्माण करते. याचा कमाल वेग १६० किमी प्रतितास इतका मर्यादित आहे.

एस ६५० गार्ड बॉडी आणि खिडक्या कठोर स्टील कोर बुलेटचा सामना करू शकतात. तसेच त्याला एक्स्प्लोजन प्रूफ व्हेईकल (ERV) रेटिंग मिळाले आहे. या गाडीमधून प्रवासी २ मीटर अंतरावर होणाऱ्या १५ किलो टीएनटी स्फोटापासून सुरक्षित राहू सकतात. खिडक्यांच्या आतील भागात पॉली कार्बोनेटचा लेप चढवला आहे. तसेच या गाडीचा खालचा भाग कोणत्याही प्रकारच्या स्फोटांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतो. जर गॅस हल्ला झाला तर केबिनमध्ये एक स्वतंत्र हवा पुरवठा करणारे यंत्र आहे.

- Advertisement -

मर्सिडीज-मेबॅक एस ६५० या गाडीच्या इंधन टाकीला एक विशेष सामग्रीचा लेप चढवला आहे. जो हिटमुळे होणारी छिद्रे आपोआप बंद करतो. हे बोईंग त्याच्या AH-64 अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टरसाठी वापरते त्याच सामग्रीपासून तयार करण्यात आले आहे. ही गाडी स्पेशल रन-फ्लॅट टायर्सवर चालते. या गाडीमध्ये सीट मसाजरसह एक जबरदस्त इंटिरियर आहे. तसेच लेगरुम वाढवण्यासाठी सुविधा आहे. यासाठी मागील सीट बदलण्यात आली आहे.

गुजराचे मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये प्रवास केला आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी बीएमडब्ल्यू ७८ सीरीज हाय-सिक्युरिटी एडिशनचा वापर केला.


हेही वाचा – PM Modi in UP : पंतप्रधान मोदींचा आज कानपूर दौरा; मेट्रो विभाग, बिना पंकी प्रकल्पाचा करणार शुभारंभ


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -