दिल्लीतील दंगलीप्रकरणी शर्जील इमामचा पीएफआयशी संबंध, पोलिसांचा चार्जशीटमधून मोठा खुलासा

दिल्लीतील दंगलीप्रकरणी शर्जील इमामचा पीएफआयशी संबंध, पोलिसांचा चार्जशीटमधून मोठा खुलासा

दिल्लीत २०२० साली झालेल्या दंगलीप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शर्जील इमामबाबत दिल्ली पोलिसांनी चार्जशीटमधून एक मोठा खुलासा केला आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेला शर्जील इमामचे पीएफआयशी संबंध होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शर्जील इमामने सीएए आणि दिल्ली दंगलीच्या निषेधार्थ जमात-ए-इस्लामी आणि पीएफआयशी संपर्क साधला होता. इतकंच नाही तर शर्जीलने त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मुख्य सदस्यांसोबत भेटून बाकीच्या विद्यार्थ्यांना भडकावले होते. त्याचा परिणाम दंगलीच्या रूपात समोर आला होता.

सीएएच्या आंदोलनादरम्यान दिल्लीच्या झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी इमामला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईलही ताब्यात घेतला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांना मोबाईल डेटा शोधत असताना त्याच्या व्हॉट्सअॅपमध्ये कोअर मेंबर्स ऑफ मेसेज नावाचा ग्रुप सापडला. या ग्रुपमध्ये शर्जील इमामने जेएनयूमध्ये झालेल्या मीटिंगाच तपशील शेअर केला होता.

शर्जील इमामने आपल्या भाषणात आसामला देशाच्या इतर भागाशी जोडणारा अरूंद भाग म्हणजेच चिकन नेक एरिया वेगळा करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्याबाबतचा आरोप इमामवर आहे. या प्रकरणा संदर्भात दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.


हेही वाचा : माझ्याविरोधात बोललात तरच पुढे जाल, नितीश कुमारांचा भाजपला टोला


 

First Published on: August 24, 2022 10:37 PM
Exit mobile version