कोरोनाच्या महामारीत फसलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा शटडाऊन, कशामुळे ते वाचा…

कोरोनाच्या महामारीत फसलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा शटडाऊन, कशामुळे ते वाचा…

चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही कायम आहे. चीनमधून कोरोना पूर्णपणे गेलेला नाहीये. कोरोनासह बर्ड फ्ल्यू आणि इतर आजारांना येथील लोकांना सामोरे जावे लागत आहे. परंतु कोरोनाच्या कचाट्यात सापडलेला चीन पुन्हा एकदा शटडाऊन होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 61 वर्षांत चीनमध्ये सर्वात मोठा उन्हाळा आणि दुष्काळ पडलेला आहे. वीज निर्मिती चीनमध्ये ठप्पा झाली असून वीजेचे संकट उभे राहिले आहे.

चीनमध्ये वीज नसल्यामुळे काही शहरं अंधारात बुडाली आहेत. तर येथील सरकारने शॉपिंग मॉल्स केवळ पाच तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. शांघाईसारख्या शहरात दोन दिवस वीज नव्हती. त्यामुळे फॉक्सवॅगन, अॅपल आणि टोयटोसारख्या कंपन्यांना त्यांचे प्लांटमधील काम बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी सिचुआन प्रांतात चोंगक्विंग शहरात तापमान 45 अंशांवर पोहचले होते. चीनमधील वाळवंटी भाग असलेल्या शिनजियांग प्रांताबाहेर आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. मंगळवारी चीनमध्ये 165 शहरांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. जास्त उष्णता आणि कमी पाऊस यामुळे चीनमधील अडचणी वाढलेल्या आहेत. जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे.

चीनमधील 15 टक्के वीज ही पाण्यापासून हायड्रोपॉवरने तयार करण्यात येते. कमी पावसामुळे या वीजनिर्मितीवर मोठा परिणाम झालेला आहे. सिचुआन प्रांतात हायड्रोपॉवरसाठी गरजेच्या असलेल्या पाण्यात 50 टक्क्यांनी घट झालेली आहे. दुष्काळामुळे सिचुआन आणि यांगत्जी नदीला लागून असलेल्या प्रांतातल्या भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. भाज्यांची वाढ ही 12.9 टक्के झाली आहे.


हेही वाचा : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली, नवी तारीख काय?


 

First Published on: August 25, 2022 6:22 PM
Exit mobile version