घरदेश-विदेशकाँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली, नवी तारीख काय?

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली, नवी तारीख काय?

Subscribe

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा आहे. सोनिया गांधी यांनी त्यांना अध्यक्षपदासाठी प्रस्ताव पाठवला असल्याचंही सुत्रांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबात मोठी माहिती समोर येत आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदाची निवडणूक काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी निवडणुकीसाठी नवी तारीख जाहीर होणार आहे. २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान ही निवडणूक होणार होती. मात्र, आता तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा – काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? राहुल-प्रियंकाचा पत्ता कट, ‘या’ नेत्याची लागणार वर्णी?

- Advertisement -

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात जाणार आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही जाणार आहेत. तसेच, काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळेस अध्यक्षपद गांधी कुटुंबाकडे जाणार की काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याला हे पद देणार हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा आहे. सोनिया गांधी यांनी त्यांना अध्यक्षपदासाठी प्रस्ताव पाठवला असल्याचंही सुत्रांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी ब्रिटनला; राहुल गांधी प्रियंका गांधीही जाणार सोबत

सोनिया गांधी यांनी २०१० साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांचे पूत्र राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्या उपचारांसाठी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत परदेशात जाणार आहेत. या काळात काँग्रेसची धुरा कोणाच्या हाती येणार यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, राजस्थानचे अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सोनिया गांधी यांनी स्वतःहून अशोक गेहलोत यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -