Corona: कोरोनापुढे ‘हा’ देश जिंकला! ‘या’ पहिल्या देशानं कोरोनाला हरवलं!

Corona: कोरोनापुढे ‘हा’ देश जिंकला! ‘या’ पहिल्या देशानं कोरोनाला हरवलं!

स्लोवेनिया

कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. अशातच एक युरोपीय देश कोरोनामुक्त झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला असून त्यांना विशिष्ट आरोग्यासंदर्भातील उपाययोजनांची आवश्यकता नाही, अशी युरोपातील देश स्लोवेनिया सरकारने घोषणा केली आहे. स्लोवेनिया हा युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश असून मागील दोन आठवड्यांमध्ये येथे रोज सातपेक्षा कमी नवीन रुग्ण आढळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

या दिलासादायक बातमीनंतर स्लोवेनियाच्या प्रशासनातर्फे असे सांगण्यात येत आहे की, आता इतर युरोपीय संघाच्या इतर देशांतील लोकांना स्लोवेनिया येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार नाही. परंतु, ज्या व्यक्ती युरोपीय संघातील सदस्य नाहीत, त्यांना दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे. यासह ज्या विदेशी नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून येतील, त्यांना आता देशात परवानगी मिळणार नाही.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश

स्लोवेनिया प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना संतर्क राहण्याचे आदेश दिले आले आहे. नागरिकांना सर्व नियमांचे पालन करणं अनिर्वाय असणार आहे. या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे तसेच एकमेकांपासून कमीत कमी दीड मीटर अंतर राखणे गरजेचे असणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना हात सॅनिटाइज्ड करणे देखील आवश्यक असणार आहे.

स्लोवेनियामध्ये १४६४ कोरोनाग्रस्त, १०३ लोकांचा बळी

स्लोवेनियामध्ये १२ मार्च रोजी महामारी घोषित करण्यात असून जवळपास २० लाख लोक राहतात. या शेजारी इटली, ऑस्ट्रिया, हंगरी आणि क्रोएशिया हे देश आहेत. स्लोवेनियामध्ये आतापर्यंत १ हजार ४६४ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये १०३ लोकांचा बळी गेला आहे.


ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश; कोरोनाविरुद्ध माकडांवर केलेली चाचणी यशस्वी!
First Published on: May 16, 2020 12:33 PM
Exit mobile version