घरदेश-विदेशऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश; कोरोनाविरुद्ध माकडांवर केलेली चाचणी यशस्वी!

ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश; कोरोनाविरुद्ध माकडांवर केलेली चाचणी यशस्वी!

Subscribe

माकडांवर केलेली ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता ही चाचणी माणसांवर करण्याचा निर्णय

चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना जगभरात धुमाकूळ घालत आहे. कोरोनामुळे जगभरात साधारण ३ लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला तर ४४ लाखांहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील विविध देश या व्हायरसविरोधात लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीत ६ माकडांवर कोरोनाविरुद्ध तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी करण्यात आली असून माकडांवर केलेली ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती मिळाली आहे.

माकडांवर केलेली ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता ही चाचणी माणसांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचणीकरता हजार वॉलेंटरियर्सना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर होणाऱ्या परिणामांचं परिक्षण पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीद्वारे chAdox1 nCoV-19 ची चाचणी करणाऱ्या संशोधनकर्त्यांनी असे सांगितले की, या लसीचे परिक्षण करण्यासाठी ६ Rhesus Macadue माकडांवर केले गेले. या केलेल्या परिक्षणातून असे समोर आले की कोरोना व्हायरला लढा देण्यासाठी लागणारी इम्यूनिटी सिस्टम चांगल्याप्रकारे सक्षम होण्यास मदत करते.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, माकडांना त्यांनी लस दिल्यानंतर १४ दिवसांमध्ये त्यांनी अँटिबॉडी विकसित केली. या लसीमुळे व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत होते. त्याचसोबत लस दिल्यानंतर माकडांमध्ये निमोनिया आढळला नाही. या लसीचा एक डोस दिल्यानंतर फुफ्फुसांवर कोरोना व्हायरसचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मदत करतो. हा व्हायरस थेट फुफ्फुसांवर हल्ला करत असल्याने रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा असा दावा या संशोधनकर्त्यांनी केला आहे.


Corona: लस चाचणीसाठी युवकाची देहदानाची इच्छा; पंतप्रधानांना लिहीले पत्र!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -