सोनिया गांधींनी बोलावली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर होणार विचारमंथन

सोनिया गांधींनी बोलावली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर होणार विचारमंथन

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या १३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात होणार आहे. पाच राज्यांतील काँग्रेसच्या पराभवावर विचारमंथन करणे आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर झाले. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. एकाच राज्यात काँग्रेसला मुख्य लढतीतही विजय मिळवता आला नाही. अशा परिस्थितीत या निकालांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे.

गोवा आणि मणिपूरमध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. या निवडणुकीत गोव्यात ४० पैकी ११ जागा काँग्रेसला मिळाल्या. मणिपूरमध्ये काँग्रेसला ६० पैकी फक्त पाच जागा जिंकता आल्या. उत्तराखंडमध्येही काँग्रेसचा भाजपकडून दारूण पराभव झाला आहे. राज्यात काँग्रेसला ७० पैकी फक्त १९ जागा जिंकता आल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेसला धक्का बसल्यामुळे निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या G-23 नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेतृत्व बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महत्त्वाची बैठक बोलावली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणारे G23 गटाचे नेते लवकरच संघटना आणि नेतृत्व बदलाची मागणी पुन्हा एकदा मांडली, अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आलं आहे.


हेही वाचा : Devendra Fadnavis : मुंबई पोलिसांची फडणवीसांना नोटीस, उद्या बीकेसीत राहणार हजर


 

First Published on: March 12, 2022 5:11 PM
Exit mobile version