घरताज्या घडामोडीDevendra Fadnavis : मुंबई पोलिसांची फडणवीसांना नोटीस, उद्या बीकेसीत राहणार हजर

Devendra Fadnavis : मुंबई पोलिसांची फडणवीसांना नोटीस, उद्या बीकेसीत राहणार हजर

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत एक स्टिंग ऑपरेशन समोर आणले होते. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्याच्या संदर्भातील माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे, त्यानंतर मला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून उद्या मी ११ वाजता बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्याप्रकरणी मी महाघोटाळा उघडकीस आणला होता. ही सर्व माहिती केंद्रीय गृहसचिव यांना मी सुपूर्द केली आहे. कोर्टानं त्याचं गांभीर्य ओळखून सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऑफिशियल सिक्रेट माहिती लीक कशी झाली याचा FIR महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला. ऑफिशिअल सिक्रेट अॅक्ट नुसार राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे. मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्नावली पाठवली. विरोधी पक्षनेते म्हणून मला माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. परंतु काल मला CRPC नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली आहे. मात्र, याची माहिती मी देईन, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

मुंबई पोलिसांकडून सीआरपीसी-१६० ची नोटीस

बदल्यांच्या घोटाळा प्रकरणामध्ये त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात मला उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आहे. जरीही मला प्रीव्हलेज असलं तरीदेखील माझ्या माहितीचा स्रोत हा विचारला जाऊ शकत नाही. या संदर्भातील जी माहिती बाहेर आली. ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी प्रेसला दिली होती. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तसेच मी स्वत: त्याठिकाणी जाणार असून पोलीस जी काही माझी चौकशी करतील. त्याला योग्य ते उत्तर मी देणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

पर्वाच्या षडयंत्राचा भांडाफोड मी स्वत: केलाय. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांना याचं उत्तर सूचत नसल्यामुळे अशा प्रकारची नोटीस मला पाठवण्यात आली आहे. मी उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Devendra Fadnavis : फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -