सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

सोनिया गांधी यांना २ जून रोजी कोरोना झाल्याचे निदर्शनास आले. सौम्य लक्षणे असल्याने त्या घरातच विलगीकरणात उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर त्यांना पोस्ट कोव्हिडचा त्रास होऊ लागला. यादरम्यान, १२ जून रोजी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्यांना श्वसननलिकेत विषाणू संसर्ग झाल्याचे समोर आले. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत चढ-उतार होत होता. मात्र, आज सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. (Sonia Gandhi discharge from hospital)

हेही वाचा सोनिया गांधींसाठी प्रियंका गांधींचा महामृत्यूंजय जप

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार, सोनिया गांधी यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना १२ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यादरम्यान सोनिया यांच्या श्वसननलिकेत बुरशीजन्य विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून कोरोनानंतर होणाऱ्या पोस्ट कोव्हिड आजारांवरही त्यांच्यावर उपचार सुरू होते.

हेही वाचा – सोनिया गांधींची प्रकृती खालावली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

२ जून रोजी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पण सौम्य लक्षणे असल्याने त्या घरातच विलगीकरणात होत्या.डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण कोरोना मुक्त झाल्यानंतर त्यांना पोस्ट कोव्हिड समस्या उद्भवल्या. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना १२ जून रोजी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांची देखभाल करण्यासाठी राहुल गांधीही रुग्णालयात थांबले आहेत. डॉक्टरांचे एक पथक सोनियांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, सोनिया यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रियंका गांधी उज्जैन येथे गेल्या होत्या. तेथे त्यांनी महामृत्यूंजय जप पूर्ण केला.

First Published on: June 20, 2022 6:34 PM
Exit mobile version