घरदेश-विदेशसोनिया गांधींसाठी प्रियंका गांधींचा महामृत्यूंजय जप

सोनिया गांधींसाठी प्रियंका गांधींचा महामृत्यूंजय जप

Subscribe

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना कोरोनाची सैम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यानंतर त्या कोरोना मुक्त ही झाल्या पण पोस्ट कोवीड समस्या उद्भवल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते. राहूल गांधी सोनिया यांच्या सोबत रुग्णालयात आहेत. तसेच सोनिया यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रीयांका गांधी उज्जैन येथे जाणार आहेत. तेथे त्या महामृत्यूजय जप पूर्ण करण्यासाठी जाणार आहेत. हा जप 11 दिवस चालनार आहे.

काँग्रेसचे माहिती पत्रक –

- Advertisement -

12 जून रोजी सोनिया गांधींच्या नाकातून रक्त स्राव होऊ लागल्याने त्यांना तातडीने सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी नंतर सोनीया यांना श्वसननलिकेमध्ये संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या उपचारांना प्रतीसाद देत असल्याचे कळते आहे. दरम्यान काल शुक्रवारी सोनिया यांच्या प्रकृती बाबतचे एक माहिती पत्रक काँग्रेसने जाहीर केले आहे. त्यात त्यांच्या प्रकृती बद्दल माहिती देण्यात आली आहे.

बुरशीजन्य विषाणूचा संसर्ग –

- Advertisement -

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना १२ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यादरम्यान सोनिया यांच्या श्वसननलिकेत बुरशीजन्य विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून कोरोनानंतर होणाऱ्या पोस्ट कोवीड आजारांवरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे पत्रकात सांगण्यात आले होते.

23 जून रोजी होणार आहे ईडी चौकशी –

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी, ईडीने सोनिया गांधींना 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, 2 जून रोजी सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी तपास यंत्रणेला हजर राहण्यासाठी नवीन तारीख देण्यास सांगितले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -