Super Variant : नव्या Covid-19 व्हेरीयंटमुळे Alert ! केंद्राची राज्यांसाठी नवी नियमावली

Super Variant : नव्या Covid-19 व्हेरीयंटमुळे Alert ! केंद्राची राज्यांसाठी नवी नियमावली

दक्षिण आफ्रिका, हॉंगकॉंग आणि बोक्सवाना येथे कोविड – १९ चा नवा व्हेरीयंट मिळाल्यानंतर भारत सरकारही अलर्ट झाले आहे. केंद्राने राज्य सरकारला या देशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने या व्हेरीयंटवर बारकाईने नजर ठेवत असल्याचे स्पष्ट केले आहे. डब्ल्यूएचओची शुक्रवारी याबाबतची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे कळते. या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा समावेश हा व्हेरीयंट ऑफ कन्सर्नमध्ये करायचा की इंटरेस्टमध्ये करायचा याबाबतचा निर्णय आज होऊ शकतो. याआधी WHO ने युरोपातील कोरोना व्हायरसची सद्यस्थिती पाहता चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांचे पत्र 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, NCDC च्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे की, बोस्तवाना (३), दक्षिण आफ्रिका (६) आणि हॉंगकॉंग (१) अशा स्वरूपात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या रूग्णांची नोंद झाली आहे. या नव्या व्हेरीयंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन्सचा समावेश आहे. आरोग्य सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, या देशांव्यतिरिक्त आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या गाईडलाईन्समध्ये धोकादायक स्थिती असलेल्या देशातील प्रवाशांची चाचणी आणि स्क्रिनिंग करणेही आवश्यक आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बाबतीत ट्रॅकिंग आणि टेस्टिंग करणे गरजेचे आहे. B.1.1.529 व्हेरीयंट पहिल्यांदा बोत्सवाना येथे आढळला आहे. जीनोमिक सीक्वेंसिंगमध्ये आतापर्यंत १० कोरोना रूग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या व्हेरीयंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन आढळले आहे. त्यामुळेच हा व्हेरीयंट संसर्गाचे कारणही ठरू शकतो.

इंपिरिअल कॉलेज लंडनच्या बॅक्टेरिया सायन्सच्या डॉ टॉम पीकॉक यांनी या आठवड्याच्या सुरूवातीला आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून व्हायरसच्या नव्या स्वरूपाबाबतची ट्विटर पोस्ट केली होती. त्यानंतर वैज्ञानिकांनी या नव्या व्हेरीयंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. पण ब्रिटनने अद्यापही या चिंतेच्या व्हेरीयंटचा समावेश हा औपचारिक पद्धतीने व्हेरीयंट ऑफ कन्सर्नमध्ये केलेला नाही.

एनआयसीडीचे कार्यकारी संचालक प्राध्यापक एड्रियन प्यूरेन यांनी सांगितले की, यामध्ये आश्चर्याची कोणतीही गोष्ट नाही की दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे नवे स्वरूप समोर आले आहे. पण आकडे सध्या खूपच कमी आहेत. तसेच आमच्या तज्ज्ञ हे या स्वरूपाला समजण्यासाठीचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.


Super variant : नव्या व्हेरीयंटमुळे WHO ने बोलावली तातडीची बैठक, UK ची फ्लाईट बंदी

First Published on: November 26, 2021 12:42 PM
Exit mobile version