सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री! LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री! LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळे गृहिणींच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२१ पासून विना सब्सिडी असणाऱ्या १४.२ किलोग्रॅम असणाऱ्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी वाढ झाली आहे. तर दिल्लीमध्ये याच विना सब्सिडी गॅस सिलेंडरची किंमत ७१९ रूपयांनी वाढली आहे. दर महिन्याच्या सुरूवातीच्या दिवसात LPG गॅस सिलेंडरची किंमत ही कमी जास्त होत असते. मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी विना अनुदानित १४.२ किलो गॅस सिलेंडरची किंमत वाढवण्यात आली आहे. तर १९ किलो सिलेंडरच्या किंमतीत १९१ रूपयांची वाढ करण्यात आल्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये दोन वेळा गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये या व्यवसायिक सिलेंडरची किंमत १२४१.५० रूपये होती. तर १ डिसेंबर रोजी १२९६ रूपये करण्यात आली होती आणि १५ डिसेंबर रोजी पुन्हा ही किंमत वाढून १३३२ रूपये वाढ करण्यात आली होती. तसेच जानेवारी महिन्यात १९ किलो असणाऱ्या व्यायवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी ५६ रूपयांची वाढ झाली असल्याने त्याची किंमत १३४९ रूपये करण्यात आली होती. यावेळी १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १५४० रूपयांच नागरिकांनी खरेदी केला. दरम्यान एकाच महिन्यात साधारण २०० रूपयांची वाढ केल्यानंतर आज पुन्हा गॅसच्या किंमतीत वाढ झाली असल्याने सर्वसामान्याचं बजेट कोलमडले आहे.

अशी तपासा LPG गॅस सिलेंडरचे किंमत

LPG गॅस सिलेंडरच्या किंमती दर महिन्याच्या सुरूवातीला बदलत असतात. सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल करत असतात. जर तुम्हाला सिलेंडरची किंमत जाणून घ्यायची असेल तर तेल कंपन्यांच्या संकेतस्थळावर भेट देऊन जाणून घेता येतील. तेल कंपन्या दरमहा त्यांच्या संकेतस्थळावर सिलेंडरचे दर जारी करत असतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमच्या शहरातील गॅसच्या किंमती जाणून घेऊ शकतात.

First Published on: February 4, 2021 4:46 PM
Exit mobile version