NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

नीट पीजी २०२२ परीक्षा (National Eligibility cum Entrance Test)स्थगित करण्याच्या आणि इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम मुदत वाढवण्याबाबत मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे. एमबीबीएसच्या सहा विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या विद्यार्थ्यांनी 12 मार्च रोजी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी केली होती आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी ठेवली होती. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट-ग्रॅज्युएट (NEET PG 2022) परीक्षा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची प्रक्रिया दुपारी 2 वाजता सुरू होईल.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ति डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ति सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीसीने ही नीट परीक्षा 6-8 आठवड्यांसाठी म्हणजेच जवळपास दोन महिने पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. यावर याचिकाकर्त्यांचे वकील गोपाल शंकरनारायणन यांनी म्हटले की, परीक्षा सहा ते आठ आठवडे लांबणीवर टाकण्यात आल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल. परंतु अद्याप काही मुद्यांवर चर्चा होणे बाकी आहे, इंटर्नशीप कालावधी पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. पण दिलेल्या मुदतीत इंटर्नशीप करणं डॉक्टरांना कोविड ड्युटीमुळे शक्य झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दोन्ही मुद्यांवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.


India Corona Update : देशात आज 70 हजारांपेक्षा कमी रुग्ण, मात्र मृतांचा आकडा 1 हजार पार


First Published on: February 8, 2022 10:27 AM
Exit mobile version