‘सुशांतच्या डायरीची पानेही फाटली होती, कडीही तुटलेली होती’; तज्ज्ञाचा खुलासा

‘सुशांतच्या डायरीची पानेही फाटली होती, कडीही तुटलेली होती’; तज्ज्ञाचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी ‘सुशांतच्या डायरीची दोन पाने फाडण्यात आली होती. तसेच सुशांतच्या रुममधील फॅनही वाकलेला नव्हता. त्याचसोबत कडीही तुटलेली होती’. त्यामुळे यावरुन सुशांतच्या चाहत्यांना या प्रकरणामध्ये काहीतरी लपवले जात असल्याची शंका येत आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्वप्रथम हे प्रकरण मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडे देण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण चौकशीनंतर सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. सुरुवातीच्या प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले होते. मात्र, आता अशी काही माहिती समोर येत आहे. ज्यामुळे या प्रकरणासंदर्भात एकंदरितच चौकशी आणि आत्महत्येसंदर्भात प्रश्न उपस्थिच केले जात आहेत. आता एका फॉरेन्सिक एक्सपर्टने या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे म्हटलं आहे. या तज्ञाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे मुंबई पोलिसांच्या चौकशीबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे.

काय करण्यात आला खुलासा

सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी एफआयआर (FIR) दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊने एक स्टींग ऑप्रेशन केले होते. ज्यामध्ये काही धक्कादायक खुलासे तज्ज्ञांनी केल्याचे वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. ‘सुशांतच्या डायरीमधील काही पाने फाटलेली दिसून आली आहेत. तसेच सुशांतने ज्या रुममध्ये आत्महत्या केली. तो पंखा वाकलेला दिसून आला नाही. जर सुशांतने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे तर त्याच्या वजनाने पंखा थोडातरी खाली वाकला असता. पण, तो काहीच वाकलेला दिसून आलेला नाही. एखाद्याने आत्महत्या केल्यास त्याच्या वजनामुळे पंख्यावर ताण पडून तो थोड्या प्रमाणात खालच्या दिशेने झुकतो, असे सूचित करायचे होते.

त्याचप्रमाणे याच स्टींग ऑप्रेशनसंदर्भातील वृत्तानुसार सुशांतच्या घरात सापडलेल्या डायरीमध्ये पहिल्या पानावर त्याचे नावं होते. त्यानंतरची काही पान फाडण्यात आली होती. मात्र, त्या डायरीमध्ये कोणती पानं फाडण्यात आली. ती कोणी फाडली आणि त्यावर काय मजकूर होता हे कळू शकले नसल्याचे वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. तसेच फॉरेन्सिक एक्सपर्टने आमच्या फॉरेन्सिक टीमची पोलिसांनी कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही, आमच्याकडून कोणतीही माहिती घेतली नाही असेही सांगितले आहे.

दरम्यान, पोलिसांनी आमच्याकडून मृत व्यक्तीचे नेल सॅम्पल म्हणजे नखांसंदर्भातील अहवाल आणि माहिती देखील घेतलेली नाही, असे देखील एक्सपर्ट म्हणाले आहेत.


हेही वाचा – ‘सुशांत प्रकरणावरुन राजकारण करणं घृणास्पद’


 

First Published on: August 9, 2020 2:15 PM
Exit mobile version