Taiwan Building Fire: तैवानमध्ये इमारतीला भीषण आग, ४६ जणाचं मृत्यू तर अनेक जखमी

Taiwan Building Fire: तैवानमध्ये इमारतीला भीषण आग, ४६ जणाचं मृत्यू तर अनेक जखमी

Taiwan Building Fire: तैवानमध्ये इमारतीला भीषण आग, ४६ जणाचं मृत्यू तर अनेक जखमी

दक्षिण तैवानमध्ये गुरुवारी १३ मजली रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत ४६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर सर्वाधिक नागरिक जखमी झाले आहेत. तैवानच्या काऊशुंग शहरात ही घटना घडली आहे. या आगीची भीषणता इतकी होती की परिसरात दूरवर धुराचे लोट पाहायला मिळाले.

काऊशुंग शहरातील अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास ही आग लागली होती. या भीषण आगीत इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले आहेत. आत्तापर्यंत ५५ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील १४ जणांचा मृ्त्यू झाला आहे. यात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र अद्यापही याठिकाणी जवानांकडून बचाव कार्य सुरु आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून इमारतीमध्ये आग विझवण्याचे काम सुरु आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आगीने रौद्ररुप धारण केल्याने इमारतीचे पात ते सहा मजले जळून खाक झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना पहाटे ३ वाजता भीषण स्फोट झाल्य़ाचा ऐकू आला होता. मृतांमध्ये सातव्या आणि नवव्या मजल्यावरील लोकांचा समावेश आहे. ही इमारत सुमारे ४० वर्षे जुनी होती. तसेच इमारतीच्या तळ मजल्यावर दुकाने आणि वरच्या बाजूस अपार्टमेंट्स होत्या.


 

India China Faceoff: अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे चोख प्रतिउत्तर


First Published on: October 14, 2021 7:24 PM
Exit mobile version