एन. टी. रामारावांची मुलगी उमाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला, पोलिसांचा तपास सुरू

एन. टी. रामारावांची मुलगी उमाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला, पोलिसांचा तपास सुरू

uma maheshwari

नवी दिल्लीः TDP संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांची मुलगी उमा माहेश्वरी यांचा मृत्यू झालाय. हैदराबादमधील ज्युबली हिल्स भागातील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला. मात्र, त्यांनी आत्महत्या केली की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. सध्या पोलीस तपासात गुंतले आहेत.

या प्रकरणी सीआरपीसी कलम १७४ (पोलिसांनी आत्महत्येची चौकशी करून अहवाल देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, तिला काही आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर प्रकृतीच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सविस्तर माहिती मिळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे उमा माहेश्वरी या माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची कन्या होत्या.


उमा माहेश्वरी या एन. टी. आर यांच्या धाकट्या कन्या होत्या

एन. टी. रामाराव हे भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि राजकारणी होते. त्यांनी तीन टर्ममध्ये सात वर्षे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1996 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एनटीआरला 12 मुले होती, त्यात आठ मुले आणि चार मुली होत्या. उमा माहेश्वरी या चार मुलींमध्ये सर्वात लहान होत्या. नुकतेच उमा माहेश्वरी यांच्या मुलीच्या लग्नात अनेक कुटुंबीय एकत्र आले होते. अभिनेता आणि माजी मंत्री एन हरिकृष्णासह एनटीआर यांच्या तीन मुलांचेही निधन झाले आहे.


हेही वाचाः शिवसेना खासदार संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

First Published on: August 1, 2022 6:43 PM
Exit mobile version