घरताज्या घडामोडीशिवसेना खासदार संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

शिवसेना खासदार संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

Subscribe

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी रात्री पावणे एक वाजताच्या सुमारास संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी रात्री पावणे एक वाजताच्या सुमारास संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर राऊतांना न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयातील युक्तीवादानतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची म्हणजेच ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.

ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य

- Advertisement -

युक्तीवादावेळी ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण संजय राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद केले. तसेच, संजय राऊत यांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे. त्यामुळे ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने ईडीची विनंती अमान्य करत ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

संजय राऊत यांच्या मालकीच्या काही कंपन्या

- Advertisement -

सोमवारी जे.जे. रुग्णालयातील वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना दुपारी २ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. संजय राऊत यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यावेळी संजय राऊत यांच्या मालकीच्या काही कंपन्या असून, या व्यवसायातून त्यांनी वैध मार्गाने पैसे कमावले. त्यांचा या घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नसल्याचे अॅड. मुंदरगी यांनी म्हटले. त्यावर पत्रा चाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत केवळ मोहरा होता. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत हेच असल्याचे ईडीच्या वकिलांनी म्हटले.

न्यायालयातील ईडी व राऊतांच्या वकिलांचा युक्तिवाद थोडक्यात

  • ईडीचे वकील – पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होता, खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते.आमच्याकडे याचे पुरावे आहेत.
  • ईडीचे वकील – संजय राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावले. संजय राऊतांना जर बेल मिळाली तर ते पुन्हा धमकाविण्याचे किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात. त्यामुळे त्यांना ८ दिवसांची कोठडी मिळावी.
  • ईडीचे वकील – राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात, याचे नेमके कारण काय?
  • संजय राऊतांचे वकील – ईडी सध्या राजकीय दबावाखाली काम करत असून संजय राऊत यांच्यावरील कारवाई हा त्याचाच भाग आहे.
  • संजय राऊतांचे वकील – संजय राऊत यांच्या काही कंपन्या आहेत. त्यातून त्यांच्याकडे वैध मार्गातून पैसा आला आहे. त्यातूनच सर्व संपत्ती मिळवली आहे.
  • संजय राऊतांचे वकील – संजय राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे. ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय?, ते हर्ट पेशंट आहेत. त्यामुळे त्यांना कमीत कमी दिवसांची रिमांड द्यावी.

संजय राऊतांना जेलमध्ये ‘या’ मुभा

राऊतांना घरचं जेवण आणि औषध देण्याची मुभा
सकाळी साडे आठ ते साडे नऊ राऊत वकिलांना भेटू शकतात
रात्री साडे दहा नंतर राऊतांची चौकशी करु नये

साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापेमारी करून साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. यातील दहा लाखाच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित दहा लाख रुपये अयोध्या दौऱ्यातून उरलेले असून ती रक्कम पक्ष कार्यालयात जमा करण्यासाठी ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.


हेही वाचा – संजय राऊत शरद पवारांचे प्यादं होतं, त्याच काम आता संपलं; संजय शिरसाटांचा घणाघात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -