सात अल्ट्रा रनर्सचा भारतीय संघाचा १०० किमी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत

सात अल्ट्रा रनर्सचा भारतीय संघाचा १०० किमी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत

अल्ट्रा रनर्स

अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) यांनी निवडलेल्या सात जणांच्या भारतीय संघात सहा पुरुष आणि एक महिला आपला सहभाग नोंदवणार असून १०० किमी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग नोंदवणार आहेत. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अल्ट्रारनर्स (आयएयु) यांच्याकडून या स्पर्धेचे दर दोन वर्षांनी आयोजन करण्यात येते. स्पर्धकांनी यापूर्वी अल्ट्रा रनिंग स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर एएफआयकडून स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. सहा पुरुषांमध्ये विकास मलिक, लेफ्टनंट कॅडर अभिनव झा, संदीप कुमार, लालू लाल मीना, बिनय कुमार साह, सुमन कुमार मिश्रा यांचा समावेश असून महिलांमध्ये अंजली सरोगी या एकमात्र स्पर्धक आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये अंजली सरोगीने आयडीबीआय फेडरल कोलकाता पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा ३:३०:५३ या वेळेत जिंकत चमक दाखवली होती. तिचा सचिन तेंडुलकरच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. ही स्पर्धा ८ सप्टेंबरला क्रोएशियाच्या स्वेती मार्टिन ना मुरी येथे होणार आहे.

या स्पर्धकांना मिळणार सहयोग

भारतीय संघाचा १०० किमी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सहभाग हे स्वप्नं साकार होण्यासारखे आहे. स्टेडियम रनला पाठिंबा दिल्याने अल्ट्रारनर्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करण्याची संधी मिळते. या स्पर्धेत रनर्सना वैद्यकीय सेवेसह सर्व सुविधा पुरविल्या जातात. भारताची आघाडीची मॅरेथॉन आणि अल्ट्रा रनिंग स्पर्धांचे आयोजन करणारी कंपनी एनईबी स्पोर्ट्स एंटरटेनमेंट आणि आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स यांच्यासह स्पोर्ट्सवेअरमधील नाव असलेली आदीदास यांनी १०० किमी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाला पूर्ण पाठिंबा देणार आहेत.

भारताची कामगिरी

अल्ट्रारनिंगला भारतात २००७ – ०८ पासून सुरुवात झाली. २००७ मध्ये भारतातून ६५ स्पर्धकांना स्पर्धा पूर्ण करण्यात यश मिळाले. आता १५०० हून अधिक स्पर्धक देशातील १८ अल्ट्रारेस स्पर्धेत आपला सहभाग नोंदवतात. एएफआयकडून जून २०१७ मध्ये इटली येथे आयोजित करण्यात आलेल्या ट्रायल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी उल्लास नारायण आणि कायरन डिसुझा यांनी सहभाग नोंदवला होता. जुलै २०१७ मध्ये बेलफास्ट येथे आयोजित २४ तास जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मीनल कोटक, अपर्णा चौधरी, उल्लास नारायण आणि कायरन डिसुझा यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

First Published on: August 8, 2018 6:01 PM
Exit mobile version