अफजल गुरुचा मुलगा म्हणतो भारतीय असल्याचा अभिमान वाटतो

अफजल गुरुचा मुलगा म्हणतो भारतीय असल्याचा अभिमान वाटतो

गलिब गुरु अफजल गुरुचा मुलागा

दहशतवादी अफजल गुरुचा मुलगा गलिब गुरु याला नुकतेच आधार कार्ड मिळाले आहे. त्यामुळे त्याला आनंद झाला असून भारतीय पासपार्ट मिळाल्यास मला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असे तो म्हणाला आहे. गलिब गुरुला आपल्या वडीलांच स्वप्न पूर्ण करायच असून त्याला डॉक्टर व्हायची इच्छा आहे. त्यासाठी तो वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेची तयारी करत आहे. त्याला तुर्किस्तानच्या मेडीकल कॉलेजमधून डॉक्टरकीच शिक्षण घेण्याची इच्छा आहे. मात्र आईने परवानगी दिल्यास भारतातून देखील शिक्षण घेण्याची तयारी त्याने दर्शवली आहे.

#WATCH Afzal Guru’s (who was executed in 2013 for his role in 2001 Parliament attack) son Ghalib Guru says, “I appeal that I should get a passport. I also have an Aadhaar card. If I get a passport, I can avail international medical scholarship.” pic.twitter.com/jJZSVht8k8

— ANI (@ANI) March 5, 2019

अफजलबद्दल काय म्हणाला गलिब?

आपण वडीलांप्रमाणे दहशतवादाच्या मार्गावर कधीही जाणार नाही असे गलिब म्हणाला. अफजल गुरु काश्मीरच्या शेर-ए महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेत होता. मात्र दहशतवादा कडे वळाल्याने त्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यामुळे वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी गलिबला डॉक्टर व्हायचे असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच बरोबर तो आपल्या आईला आपल्या आयुष्यात जास्त महत्व देतो. आईने आपल्याला काश्मीर मधील दहशतवाद, लष्करवाद यापासून नेहमीच दूर ठेवले. मला माझ्या आईचे उर्वरीत आयुष्य सुखकर करायचे असल्याचे देखील त्याने सांगितले. गलिब अभ्यासात अतिशय हुशार असून त्याला दहावीत ९५ टक्के तर बारावीत ८९ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे तो डॉक्टर नक्की होईल, असा विश्वास त्याचे अजोबा गुलाम मोहम्मद यांनी व्यक्त केला आहे. गलिबच्या अजोबांनी इतिहास विषयात पीएचडी मिळवली होती. त्यामुळे ७३ वर्षाचे आजोबा माझ्या साठी प्रेरणास्थान असल्याच देखील तो सांगतो. अफजल गुरुच्या वडिलांच शिक्षण, गलिब अहमदच डॉक्टर होण्याच स्वप्न, तर अफजल गरुच अर्धवट राहिलेल शिक्षण एकंदरीतच त्याची कौंटुबिक पार्श्वभूमीपाहता तो दहशतवादाकडे वळण्यास काय कारण असेल, असा प्रश्न पडतो. तर दुसरीकडे जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना चांगल्या कुटुंबातील मुलांना दहशतवादी होण्यास भरीस पाडतात आणि मग अफजल गरु आणि यांसारखे असंख्य दहशतवादी उद्याला येतात.

कोण आहे अफजल गुरु?

दहशतवादी अफजल गुरुसह त्याच्या पाच साथीदारांनी १३ डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी संसदेच्या आवारात घुसून अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये दिल्ली पोलिस दलातील पाच जणांचा समावेश होता. केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक महिला, संसदेतील दोन कर्मचारी आणि एका पत्रकाराचा समावेश होता. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच अफजल गुरुला अटक केली होती. सहा वर्षांपूर्वी ९ फेब्रुवारी २०१३ ला त्याला तिहार कारागृहात फाशी देण्यात आली. सध्या श्रीनगर जवळील गुलशनाबाद गावात त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.

First Published on: March 5, 2019 2:31 PM
Exit mobile version