श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्लात पोलिसाचा मृत्यू; गोळीबारात चिमुकलीही गंभीर जखमी

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्लात पोलिसाचा मृत्यू; गोळीबारात चिमुकलीही गंभीर जखमी

पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, अमरनाथ यात्रेदरम्यान करणार होते हल्ला

जम्मू काश्मिरमधील श्रीनगरमध्ये (Srinagar) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला (Jammu Kashmir Terrorist Attack) केला आहे. दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या असून, यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सैफुल्ला कादरी असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. श्रीनगर जिल्ह्यातील सुरा भागात हा हल्ला झाला. एवढेच नाही तर या हल्ल्यात त्यांची मुलगीही जखमी झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी रुग्णालयात शिरुन पोलीस कर्माचऱ्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात त्यांची चिमुकली मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे. सद्यस्थितीत या मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

हेही वाचा – जागतिक दहशतवादविरोधी दिन

या घटनेनंतर जम्मू-काश्मिर (Jammu and Kashmir) पोलिसांनी संबंधित परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केल्याचे प्रमाण वाढले आहे.

याआधी महिन्याच्या सुरुवातीला श्रीनगरच्या अली जान रोड स्थित ऐवा ब्रिज येथे दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला लक्ष्य केलं होतं. पोलीस कर्मचारी गुलाम हसन डार यांच्यावर गोळी झाडली होती. सुदैवानं ते बचावले. पण ते गंभीर स्वरुपात जखमी झाले. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – राज ठाकरे खेळाचं मैदान सोडून पळत आहेत, बृजभूषण सिंह यांचा टोला

First Published on: May 24, 2022 7:28 PM
Exit mobile version