राज ठाकरे खेळाचं मैदान सोडून पळत आहेत, बृजभूषण सिंह यांचा टोला

मी कोहिनुरचा कोणताही हिरा मागितलेला नव्हता. मी फक्त दोन शब्द मागितले होते. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. परंतु त्यांचे सहकारी चांगले नसल्यामुळे ते माफी मागत नाहीयेत. नाहीतर त्यांनी माफी मागितली असती. तसेच ते अयोध्येला आले असते. मात्र, त्यांनी माफी न मागून मोठी चूक केली आहे. राज ठाकरेंना (Raj Thackeray) उत्तर भारतात कुठेही येऊन देणार नाही. त्यांचा विरोध केला जाईल. कोणत्याही हिंदी भाषिक राज्यात त्यांना पाऊल ठेवून देणार नाही. यावेळी त्यांचा विरोध केला जाईल, असं भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) म्हणाले.

राज ठाकरे खेळाचं मैदान सोडून पळत आहेत

बृजभूषण सिंह यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरे आता खेळाचं मैदान सोडून पळत आहेत. ठाकरेंना ट्रॅप केलं जातंय अशा प्रकारचा आरोप देखील त्यांनी आमच्यावर लावला आहे. परंतु कोण षडयंत्र करत होतं आणि त्यांना ट्रॅप करत होतं, ते त्यांनाच माहितीये. मात्र, अयोध्येला ५ जून रोजी ५ लाख लोकांसोबत मी जाणार आहे. ५ जूनला मी सर्व लोकांसोबत महादर्शन करणार असून मी एक कार्यक्रम ठेवला आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे चिरंजीव ५० क्विंटलचा लाडू तयार करणार आहेत. आम्ही हनुमान आणि श्री रामाचं दर्शन करणार आहोत, असं खासदार बृजभूषण सिंह म्हणाले

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फोटो ट्विट

मी भारतीय कुस्ती संघाचा अध्यक्ष आहे. ३ वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी एका कुस्तीचा खेळ सुरू होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आले होते. शरद पवारांची (sharad pawar) महानता इतकी आहे की, त्यांनी तिन्ही दिवस या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शरद पवारांचा मी आदर करतो. लाखो लोकांच्यामध्ये जरी ते दिसले. तर मी त्यांचा सन्मान करेन. त्यामुळे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. मी सक्षम असून त्यांना अयोध्येला येण्यापासून रोखणार, असं सिंह म्हणाले.

दरम्यान, त्यांना कोणीही ट्रॅप करत नव्हतं. तर ते स्वत:च लोकांना ट्रॅप करत होते. काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील माझ्याशी संवाद साधला, असं देखील सिंह म्हणाले.


हेही वाचा : राज ठाकरेंनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं, बृजभूषण यांचा मनसेच्या आरोपानंतर टोला