नीरव मोदीला सुनावली ९ दिवसांची पोलीस कोठडी

नीरव मोदीला सुनावली ९ दिवसांची पोलीस कोठडी

भारतात सर्वात मोठा बँकिंग घोटाळा करून फरार झालेला आणि पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणारा नीरव मोदी याला आज दि. २० रोजी लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. हिरे व्यापारी नीरवच्या विरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटर वॉरंट काढले आहे. नीरव मोदी याने न्यायालयात सुनावणी दरम्यान जामीनाची विनंती केली होती. तसेच तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करेन. प्रवासासंबंधीचे सर्व कागदपत्रे मी सादर करेन, असे त्यांने न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने त्याचे जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

ईडीला मालमात्ता जप्तीचे आदेश 

मुंबईमधील आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नीरव मोदीच्या भारतातील मालमत्तीची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. तसेच नीरवच्या पत्नी अमी मोदीविरोधातही अटकपूर्व वॉरंट काढण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, नीवर मोदीच्या १७३ महागड्या पेंटिग्ज आणि ११ लक्झरी कार्स विकण्यासंबंधीत कोर्टाने ईडीला परवांनगी दिली आहे. लिलावाच्या माध्यमातून नीरवची मालमत्ता विकली जाणार आहे. नीरव याने केलेल्या घोटाळ्यामध्ये त्याचा मामा मेहुल चोक्सीसुद्धा सहभागी होता. ईडी आणि केंद्रीय तपास पथकाकडून मोदी आणि त्याचा मामा चोक्सी यांचा तपास सुरू आहे. या दोघांच्या मिळून ४,७६५ कोटी रुपयांची संपत्ती आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे.

First Published on: March 20, 2019 8:12 PM
Exit mobile version