घरदेश-विदेशलंडनमध्ये ९ लाखाच्या जॅकेटमध्ये दिसला नीरव मोदी

लंडनमध्ये ९ लाखाच्या जॅकेटमध्ये दिसला नीरव मोदी

Subscribe

ब्रिटिश वृत्तपत्र 'द टेलीग्राफ' ने नीरव मोदीचा एका व्हिडिओ प्राकाशित केला आहे. या व्हिडिओमध्ये नीरव मोदी चैनीत राहत असल्याचे दिसत आहे.

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात चैनीचे जीवन जगत असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या व्हिडिओ मध्ये नीरव मोदी ९ लाखाच्या जॅकेटमध्ये दिसला. ‘द टेलिग्राफ’ या आंतराष्ट्रीय वृत्तपत्राने हा व्हिडिओ प्राकाशित केला आहे. नीरव मोदीला कर्जा बद्दल विचारल्यास त्याने ‘नो कमेंट’ म्हणून उत्तर दिले आहे. नीरव मोदीला बघून तो लवकर भारतात येणार असे वाटत नाही.

बँकेचा घोटाळा करून झाला होता पसार

नीरव मोदी १३ हजार ७०० कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. नीरव मोदीने गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाला पत्राद्वा उत्तर पाठवून असे सांगितले होते की, तो सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येऊ शकत नाही. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार नीरव मोदी याला ब्रिटनने नॅशनल इंश्योंरेंस नंबर जारी केला आहे. यानुसार तो ब्रिटनमध्ये केवळ व्यवसायच नाही तर तेथील बँकांची खातीही वापरू शकतो. दरम्यान, ईडीने प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कोर्टात नीरव विरोधात अर्ज दाखल केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -