Ayodhya Ram Mandir : आज अयोध्येत होणार राम मंदिर गाभाऱ्याची पायाभरणी, मुख्यमंत्री योगींच्या हस्ते शुभारंभ

Ayodhya Ram Mandir : आज अयोध्येत होणार राम मंदिर गाभाऱ्याची पायाभरणी, मुख्यमंत्री योगींच्या हस्ते शुभारंभ

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्री राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. राम मंदिर उभारणीच्या व्यासपीठाचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता मंदिराच्या दुसऱ्याला टप्प्याला सुरूवात होणार आहे. त्याअंतर्गत गर्भगृहाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. अयोध्येत आजपासून राम मंदिर उभारणीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी होणार आहे.

राम मंदिराच्या व्यासपीठाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा राम मंदिराच्या गर्भगृहाकडे लागल्या आहेत. योगी आदित्यनाथ आज अयोध्येत राम मंदिराच्या गर्भगृहाच्या पायाभरणीचे पहिले शिलान्यास करणार आहेत. ज्यातून गर्भगृहाच्या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान वैदिक मंत्रांच्या पठणासह विधिवत पूजा केली जाणार आहे.

गाभाऱ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास, सरचिटणीस चंपत राय यांच्यासह सुमारे २५० संत आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. श्री राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या पायाभरणीनंतर डिसेंबर २०२३ पर्यंत गाभाऱ्याचं काम पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : Ayodhya Ram Mandir: भूमीपूजनापूर्वी ‘रामलल्ला’ झाले अब्जाधीश!

सध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी गुलाबी दगडांचा वापर केला जात आहे. राजस्थानमधील भरतपूरच्या बन्सी पर्वतातून हे पदार्थ काढले जात आहेत. ज्यावर नाहर शैलीत कलाकृती बनवण्याचे काम केले जात आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतर श्री राम मंदिराची उंची आणि भव्यता वाढवण्याची मागणी होऊ लागली. यानंतर श्री राम मंदिराचे मॉडेल बदलताना इतरही काही बदल करण्यात आले. त्यामुळे मंदिरात बसवलेल्या दगडांची संख्याही वाढवण्यात आली.


हेही वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्याचे राम मंदिर दगडांनी बनणार


 

First Published on: June 1, 2022 10:17 AM
Exit mobile version