घरताज्या घडामोडीAyodhya Ram Mandir: अयोध्याचे राम मंदिर दगडांनी बनणार

Ayodhya Ram Mandir: अयोध्याचे राम मंदिर दगडांनी बनणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्टला अयोध्येतल्या राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पर पडला. अयोध्येतील हे राम मंदिर दीर्घ काळ टिकण्यासाठी बांधकामात फक्त दगडांचाच वापर केला जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे हे म्हणणे आहे. दगडांपासून बांधलेले मंदिर हजार वर्षांहून अधिक काळ राहिल, असे चंपय राय म्हणाले.

विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी असलेले चंपय राय पुढे म्हणाले की, ‘मंदिर बांधकाम प्रक्रियेमध्ये आयआयटी-चेन्नई आणि केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान (सीबीआरआय) च्या सदस्यांचे मत देखील घेतले जात आहे.’

- Advertisement -

पत्रकारांशी बोलताना राय म्हणाले की, ‘लार्सन And टुब्रो मंदिराची निर्मिती करेल. आयआयटी-चेन्नईचे अभियंता या जागेच्या क्षमतेची तपासणी करतील. तर सीबीआरआयच्या लोकांच्या सल्लानुसार मंदिर भूकंप प्रतिरोधक केले जाईल.’ तसेच पुढे राय म्हणाले की, ‘मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे १० हजार तांब्याचे रॉडस् वापरले जातील. जे लोक मंदिराच्या निर्मितीसाठी मदत देण्यास इच्छूक आहेत, त्यांनी तांबे दान करा, असा सल्ला दिला आहे.’

‘हवा, पाणी आणि सूर्यप्रकाशामुळे नुकसान होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन मंदिर दगडांपासून तयार केले जाईल, जेणेकरून हजारो वर्षे मंदिर उभे राहिलं.’

- Advertisement -

हेही वाचा – ‘राम मंदिर हा न्याय आणि सत्याचा विजय; ओवेसी आता रडणे बंद करा’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -