भारतातील सक्रीय कोरोना रुग्णसंख्येत सलग सहाव्या दिवशी घट

भारतातील सक्रीय कोरोना रुग्णसंख्येत सलग सहाव्या दिवशी घट

कोविड-१९ मधून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत रोज वाढत होत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूदरात घट होत आहे. यामुळे कोविड रुग्णसंख्येतील घट नोंदवण्याकडे भारताची वाटचाल कायम आहे. सलग सहाव्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या सहा लाखांहून कमी नोंदवण्यात आली आहे.

देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी ६.४२ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात दर दशलक्षामागील बाधित रूग्णांची सरासरी राष्ट्रीय सरासरीहून कमी आहे. कोरोना मुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येने ७६.५ लाखांचा आकडा पार केला. बरे होणार्‍यांच्या वाढत्या संख्येमुळे राष्ट्रीय रोगमुक्तीचा दरसुद्धा सातत्याने वाढत आहे. रोगमुक्तीच्या राष्ट्रीय स्तरावरील दरानेसुद्धा ९२.०९ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. संपूर्ण देशात गेल्या २४ तासांमध्ये ५३ हजार २८५ जणांना बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे, तर ४६ हजार २५३ ही नवी रूग्णसंख्या नोंदवली गेली.

देशाच्या निदान चाचणी क्षमतेत जलद वाढ होत आहे. ११ कोटी २९ लाख ९८ हजार ९५९ चाचण्या झाल्या असून, गेल्या २४ तासात १२ लाख ९ हजार ६०९ चाचण्या झाल्या. १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात दर दशलक्षामागील चाचण्यांची संख्या राष्ट्रीय सरासरीहून जास्त आहे.

First Published on: November 4, 2020 7:31 PM
Exit mobile version