Maha Kumbh 2021: कुंभ मेळ्यात शाही स्नानादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!

Maha Kumbh 2021: कुंभ मेळ्यात शाही स्नानादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!

कुंभ महोत्सव नाशिक, इलाहाबाद, उज्जैन, आणि हरिद्वारमध्ये साजरा करण्यात येतो. उत्तराखंडच्या हरिद्वार येथे कुंभ मेळाचा शुभारंभ झाला असून हरिद्वारच्या कुंभसाठी राज्य सरकारने जय्यंत तयारी केली आहे. हरिद्वारमध्ये सुरु असणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये दुसऱ्या शाही स्नान पर्वाची सुरुवात झाली आहे. या कुंभ मेळ्यात सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र म्हणजे हे शाही स्नान असतं. देशभरातील आखाडे आणि साधुंचा गट कुंभ मेळात शाही स्नानासाठी हजेरी लावलात. शाही स्नानाला विशेष महत्त्व असल्याने मोठ्या समुदायाने कित्येक साधू – संत गंगा नदीत स्नान करताना पाहायला मिळतात. मात्र यंदा कोरोनाचं संकट देशावर असताना कोरोनाच्या नियमांचे पालन करत हा कुंभमेळा पार पडणार आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असताना देखील उत्तराखंडमधील हरिद्वार येथे असणाऱ्या हर की पौडी भागात दुसऱ्या शाही स्नानासाठी नागा बाबांसह साधु-संतांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शाही स्नानादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बघा व्हिडिओ

 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील हरिद्वार येथे असणाऱ्या हर की पौडी भागात दुसऱ्या शाही स्नानासाठी अनेकांनीच गर्दी केल्याने या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन होणं कठीण असल्याचे कुंभ मेळ्यातील आयजी संजय गुंज्याल यांनी सांगितले. तर शाही स्नानादरम्यान होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करण्याचे आदेश दिल्यास धक्का-बुक्की, चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या भागात कोरोनाच्या नियमांचं कठोर पालन करणं अशक्य असल्याचे यंत्रणांकडून सांगितले जात आहे.

 

हरिद्वार कुंभचे दूसरे शाही स्नान आज १२ एप्रिलला सोमवारी असून हा दिवसही अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी सोमवती अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी स्नान-दान केल्याने मोठे पुण्यं मिळते, असे मानले जाते. या दिवशी लोक पवित्र नदीत स्नान करतात आणि आपल्या पित्रांसाठी यज्ज्ञ करतात. पूर्वजांच्या तृप्तीसाठी पिंडदानही केले जाते, त्यामुळे या शाही स्नालाला विशेष महत्त्व आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच कुंभमेळा कोरोनाचं सुपर स्प्रेडर ठरू शकतो, अशी भिती नीती आयोगाकडून वर्तवण्यात आली होती. यावेळी केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी चिंता व्यक्त केली की, यंदाचा कुंभमेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरू शकतो. यासह, “जर सरकारने ठरलेल्या वेळेपूर्वी कुंभ संपविण्याचा निर्णय घेतला नाही तर हा कुंभमेळा कोरोनाचं सुपर स्प्रेडर ठरू शकतो.”, असे भाकीत देखील नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आले आहे.


First Published on: April 12, 2021 1:27 PM
Exit mobile version