घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : तुम्हाला दिल्लीला पाठवणारच, उद्धव ठाकरेंचा वर्षा गायकवाडांना शब्द

Uddhav Thackeray : तुम्हाला दिल्लीला पाठवणारच, उद्धव ठाकरेंचा वर्षा गायकवाडांना शब्द

Subscribe

काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना गुरुवारी पक्षाकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना पक्षाकडून उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. 25 एप्रिल) काँग्रेसकडून याबाबतची घोषणा केली. त्यानंतर आज शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) वर्षा गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गायकवाड या उद्धव ठाकरे यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढत असल्याने यासाठीच त्यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणारच, अशा शब्द दिला आहे. (Uddhav Thackeray give words to send Varsha Gaikwad to Delhi)

काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रथम प्रसार माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीत पाठवणे, हीच सध्या भावना आहे. त्यामुळे देशात हुकूमशाही येता कामा नये, घटनेचे रक्षण झाले पाहिजे, घटना बदलता कामा नये त्यासाठी महाराष्ट्रात मविआ आणि देशात इंडिया एकत्र लढून जिंकणार, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा… Manoj Jarange : मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, जरांगेंचे समाजाला आवाहन

वर्षा गायकवाड या मुंबईच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्या कुठूनही उभ्या राहिल्या, तरी विजयी होतीलच. त्यातही त्यांना मिळालेला मतदारसंघ हा माझा घरचा मतदारसंघ आहे. तर, उत्तर मुंबई लोकसभेबाबत तुम्हाला आणि आम्हाला उत्तर मिळेले. पण घोसाळकर आणि इतर सर्व जागेवर आहेत, त्यामुळे या मतदारसंघाचा उमेदवार लवकरच कळेल, अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आली.

- Advertisement -

2004 ची पुनरावृत्ती होणार…

उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याबाबत बोलताना काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड म्हणाल्या की, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ माझ्यासाठी नवा नाही, मी इथे काही महिन्यांपासून राहात आहे. त्यामुळे इथली मला माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्हीही सहा लोकसभा जिंकणार आहोत आणि या मतदारसंघात 2004 ची पुनरावृत्ती होणार, असेही यावेळी वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.

माझे मत वर्षा गायकवाड यांना…

माझे मत मी वर्षा गायकवाड यांना देणार आहे. त्यामुळे त्यांना अजून काय हवे आहे. यावेळी पहिल्यांदा जरी पंजावर मतदान करत असलो तरी त्या पंजामध्ये मशाल आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. तर, हात आणि मशालीचा एकत्रितपणा होऊन आम्ही तुतारी फुकणार आहोत. त्यामुळे मविआचा विजय निश्चित आहे, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : आवाहन करूनही मतदानाची टक्केवारी वाढेना, नेत्यांना चिंता


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -