अरविंद केजरीवालांच्या उपोषणाचा तिसरा दिवस

अरविंद केजरीवालांच्या उपोषणाचा तिसरा दिवस

फोटो सौजन्य - एनडीटीव्ही

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या घरी अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मुख्य सचिवांना मारहाण केल्याच्या कथित प्रकरणावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केजरीवाल सरकारशी असहकारची भूमिका घेतली आहे. परिणामी फक्त महत्त्वाच्या मुद्यांवर निर्णय होत नसल्याने केजरीवाल सरकार अडचणीत सापडले आहे. मागील ३ महिन्यांपासून सुरू असलेला वाद मिटावा अन्यथा नायब राज्यपालांच्या घरातून हलणार नाही असी भूमिका घेत अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या घरी उपोषण सुरू केले आहे. त्याचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान अधिकारी आपले काम करत असल्याचा दावा नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केला आहे. सरकार आणि अधिकाऱ्यांच्या वादात सध्या कोंडी झालेली पाहायाला मिळत आहे ती दिल्लीकरांची.

केव्हापासून सुरू आहे उपोषण

अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात सोमवारपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. शिवाय केंद्र सरकार अधिकाऱ्याचे बोलवते धनी असून आप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मात्र, अद्याप तरी नायब राज्यपाल अनिल बैजल यांची आणि अरविंद केजरीवालांची भेट झालेली नाही. त्यामुळे या प्रश्नांवर तोडगा केव्हा निघाणार? असा प्रश्न विचारला जात आहे. अरविंद केजरीवाल यांनी उपोषण केल्यानंतर भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

First Published on: June 13, 2018 9:57 AM
Exit mobile version