साताऱ्यात थरार! शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून शंभूराज देसाईंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, दोन ठार

साताऱ्यात थरार! शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून शंभूराज देसाईंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, दोन ठार

सातारा – साताऱ्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने शंभूराज देसाईंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी पाटण तालुक्यातीलर मोरणा खोऱ्यात हा गोळीबार केला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे.

या गोळीबारामागचे नेमके कारण समोर आलेले नाही. परंतु, पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिकांनी मदन कदम यांच्या घराभोवती वेढा दिला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चाललंय काय? शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखाची भररस्त्यात हत्या

ठाण्यातही हल्ल्यांचे सत्र

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही असाच थरार झाला होता. शिवसेना उपविभाग प्रमुख रवींद्र परदेशी यांची हत्या करण्यात आली होती. ते खारकर आळी येते राहण्यास होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच त्यांना जांभळी नाका येथील शिवसेना शाखेचे उपविभाग प्रमुख पद दिले होतेय. २८ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – धक्कादायक! सांगलीत दिवसाढवळ्या भाजपा नगरसेवकाची हत्या

First Published on: March 20, 2023 8:23 AM
Exit mobile version