टिकटॉकने ट्रम्प प्रशासनाला खेचले कोर्टात

टिकटॉकने ट्रम्प प्रशासनाला खेचले कोर्टात

टिकटॉकने वॉशिंग्टनमध्ये सुरू असणाऱ्या सुनावणीत न्यायाधीशांना ट्रम्प प्रशासनाला बंदी घालण्यापासून रोखावे अशा शब्दात आपली बाजू मांडली. टीक टॉक आणि त्याची मूळ कंपनी, बाईटडन्स लिमिटेड यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात दुसऱ्यांदा टिकटॉकने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या न्यायालयात आव्हान उभे केले आहे.
अमेरिकेमध्ये अ‍ॅपवर बंदी घालण्यापासून ट्रम्प प्रशासनाने रोखल्यामुळे अमेरिकेत तंत्रज्ञानावर भौगोलिक-राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे असे टिकटॉकचे म्हणणे आहे.

ट्रम्पने त्यांच्या अधिकारांचा वापर करत एपवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन कायद्यानुसार हा प्रकार योग्य नसल्याचे टिकटॉकने स्पष्ट केले आहे. ही बंदी म्हणजे मुक्तपणे भाषणाच्या अधिकारावर गदा असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. पण या सगळ्या प्रकरणावर व्हाईट हाऊसकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. ट्रम्प यांच्या अशा वागण्यामुळे अमेरिकेतील ऑनलाईन पद्धतीने व्यक्त होणारी ऑनलाईन कम्युनिटीवरच गदा आणण्याचा प्रकार आहे असे टिकटॉकचे म्हणणे आहे. अमेरिकेतील टिकटॉक वापरकर्त्यांची सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी टिकटॉकने दिलेल्या पुराव्यांकडे अमेरिकन सरकार दुर्लक्ष करत असल्याचा टिकटॉकचा दावा आहे.

याआधी 6 ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश जारी केला. त्यामध्ये दिवसांच्या आत टिकटॉक अॅपद्वारे केलेल्या व्यवहारावर बंदी घालण्यात येईल, असा युक्तिवाद करत एपवर बंदी घातली. एपवर बंदी घालताना राष्ट्रीय सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे असे कारण यावेळी देण्यात आले. ऑगस्टमध्ये कॅलिफोर्नियामधील फेडरल कोर्टात हा आदेश रोखण्यासाठी टिकटोकने फिर्याद दिली. परंतु शुक्रवारी, वाणिज्य विभागाने ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले आहे. येत्या 12 नोव्हेंबरपासून अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घातली जाईल.

 

First Published on: September 19, 2020 1:38 PM
Exit mobile version